करंदीकर गुरुजी
मेष : धार्मिक शुभसमारंभात सहभागी होण्याचे योग येतील. मंगळ धाडसी निर्णय घेण्यास प्रवृत्त करेल. परदेशातील भावंडांशी सल्लामसलत करुन महत्वाचे निर्णय घेतले जातील. प्रवासातून कार्यसिद्धी होईल. विरोधकांच्या कारवायांना मोठ्या युक्तीवादाने तोंड द्याल. व्यवसायात अधिकारपदाची प्राप्ती होईल. सामाजिक कार्यात आपल्याला योग्यप्रतिसाद मिळेल. समाजात आपल्या मतांचा आदर होईल. तरुणांच्या कौशल्याला चांगला वाव मिळेल. आपल्या कतृत्वाला चांगली झळाळी मिळेल. न्याय प्रवीष्ठ प्रकरणातून लाभ होतील. थोरा-मोठ्यांच्या सहकार्याने आपली रेंगाळलेली कामे मागी लागतील. कर्जप्रकरणे मंजूर होतील. नवीन परिचय होतील. आपले ध्येय साध्य करता येईल. व्यावसायिकांना उत्कर्षकारक ठरेल.नवीन कार्यारंभ करण्याचा उत्साह निनिण होईल. कामाच्या विस्ताराचा सतत ध्यास घ्याल. नवीन कल्पना आकार घेतील. वैयक्तीक उत्कर्ष करणारे राहील. नवीन व्यावसायिक करार घडतील. आपल्या कार्यक्षेत्रातून प्रशिक्षणासाठी निवड झाल्यामुळे परगावी जाण्याचे योग येतील. समाजिक प्रतिष्ठा उंचावेल. महत्वाचे निर्णयात योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन लाभेल. नोकरीत बदल करु इच्छिणाऱ्या तरुणांना याशोमार्ग लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. अनुकूल व्यक्तींशी संपर्क साधण्यात यश येईल.
वृषभः कुटुंबात आध्यात्मिक कार्य घडून येतील. गोड बोलून आपली अनेक कामे मार्गी लावण्यात यश येईल. जूनी व्यावसायिक येणी वसूल होतील. कौटुंबिक जबाबदर्या पार पाडाल. सतत सुवार्त कानी येतील. सामाजिक क्षेत्रातील आपल्या आघाडीच्या नेतृत्वामुळे समाजात प्रतिष्ठा उंचावेल. इच्छापूर्ती होईल. राजकारणी व्यक्तीना मात्र काही अडचणींना सामोरे जावे लागण्याची शक्यता राहते. आपल्या वक्तृत्त्वावर सभोवतालच्या व्यक्ती हुरळून जातील. कामानिमित्तच्या घडणार्या प्रवासात अडचणी उद्भवण्याची शक्यता आहे. मित्रपरिवाराबरोबर करमणुकीच्या कार्यक्रमातून आनंद घ्याल. आपल्या कार्यकौशल्यामुळे कार्यक्षेत्रातून आपली प्रशंसा केली जाईल. खेळाडूंना समाजात मानाचे स्थान मिळेल. अनपेक्षित धनप्राप्तीचे योग येतील. सासूरवाडीकडून आर्थिक लाभ घडून येतील. कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका. आपले तत्व सोडून नोकरीत कोणताही निर्णय घेऊ नका. प्रवासात आपल्या मौल्यवान वस्तू सांभाळा. सार्वजनिक संबंधाच्या प्रश्नांशी सतत संबंध येतील. त्यातूनच समाजात नांवलालौकिक वाढेल. उत्तरार्धात कल्पनाशक्तीला वाव देणार्या घटना घडतील. सरकारी कामात योग्य प्रगती होईल. प्रकृतीच्या तक्रारांकडे दुर्लक्ष करु नका. उष्णतेचे विकार, संसर्गजन्य विकार यांचा त्रास होण्याची शक्यता राहते. स्त्री व्यक्तींकडून नुकसान संभवते.
मिथुन: हे वर्ष आपल्या बुद्धीकौशल्याची चांगली चुणूक दाखविणारा राहील. लेखक, साहित्यिक, संपादक, प्रकाशक तसेच विविध भाषांचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी अनुकूल ग्रहमान आहे. वाचनाचा तसेच लेखनाचा व्यासंग वाढेल. स्पर्धापरीक्षांतून चांगले यश प्राप्त होईल. विवाहेच्छूक तरुणांचे विवाह ठरतील. सरकारी अधिकारी, पोलिस खाते यांत काम करणार्या व्यक्तींसाठी अनुकूल फलदायी आहे. वातविकारांपासून शारिरीक त्रास दर्शवतो. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करु नये. कुटुंबात वादंग निर्माण होतील. गृहउद्योग अथवा जोडधंद्यातून फायदा होईल. व्यवसायत उद्योगातून चांगली प्राप्ती होईल. घरातील सुखसुविधा वाढविण्याकरीता महिला इलेक्टाॅनिक्सच्या वस्तूंची खरेदी करतील. आपले काम दुसर्यावर सोपवू नका. पत्नीचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. एकमताने निर्णय घ्याल. सामाजिक प्रतिष्ठा उंचावेल. मिळालेल्या संधींचा लाभ आपले भविष्य उज्वल करणारा राहील. आदिक आवक वाढेल. भागीदारी व्यवसायातून आपणांस चांगला फायदा होईल. नवीन रचनात्मक कलाकृतींचा ध्यास घ्याल.मोठठ्या प्रमाणावर तूर्त गुंतवणूक करु नका.
कर्क : लेखक, साहित्यिक, संपादक यांच्यासाठी अनुकूल फलदायी आहे. लेखकांच्या हातून झालेल्या दर्जेदार लिखाणासाठी पुरस्कार मिळतील. प्रतिष्ठीत व्यक्तींचे सहकार्य लाभेल व त्यामुळे आपली रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. नोकरी व्यवसायात हाताखालची माणसे मनाप्रमाणे काम करतील. नोकरीत बढतीचे योग येतील. व्यावसायीक प्रदर्शनातून चांगला फायदा होईल. कवि, कलाकारांना सतत प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचे योग येतील. आपले काम करुन घेताना जिभेवर साखर पेरणी करण्याची जरुरी आहे. एखाद्या व्यवहारात अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभाचे योग येतील. प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करु नका. नोकरीच्या शोधात असणार्या तरुणांसाठी उत्तरार्ध शुभफलदायी राहील. आपले धाडस व कर्तबगारी वाढेल. आपणांस विरोध करणार्या व्यक्तींकडून सहकार्य झाल्यामुळे कामे मार्गी लागतील. सांधेदुखीचा त्रास असणार्यंना त्रस्त करणारा राहील. गुरुचे भ्रमण धार्मीक ओढा वाढविणारे राहील. सूचक स्वप्ने पडतील. धाडसी उपक्रम राबविले जातील. भावंडांचे सहकार्य लाभेल. संशोधनपर अभ्यासक्रमातून सामाजिक पत उंचावेल. जून्या मैत्रीला उजाळा मिळेल. अवाजवी साहस टाळावे.
सिंह : खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न कराल. नेत्रविकार, उष्णतेचे विकार यांच्यापासून त्रास होण्याची शक्यता आहे. नव्या ओळखी होतील व त्या फायदेशीर ठरतील. आपल्या कार्यकौशल्यामुळे कार्यक्षेत्रातून आपली प्रशंसा केली जाईल. मित्रपरिवाराबरोबर करमणुकीच्या कार्यक्रमातून आनंद घ्याल. आपली आदिक बाजू बळकट करणार्या घटना घडतील. जुनी थकेलेली येणी वसूल होतील. सामाजिक क्षेत्रातील आपल्या आघाडीच्या नेतृत्वामुळे समाजात प्रतिष्ठा उंचावेल. इच्छापूर्ती होईल. राजकारणी व्यक्तीना मात्र काही अडचणींना सामोरे जावे लागण्याची शक्यता राहते. आपल्या वक्तृत्त्वावर सभाेवतालच्या व्यक्ती हुरळून जातील. नवादित कलाकारांना चांगल्या संधी लाभतील. कवि, कलाकारांना शुभफलदायी आहे. तसेच सहलीच्या निमित्ताने लांबच्या प्रवासाचे योग येतील. हौसेममौजेखातर खर्च कराल. महिलांना दैनंदिन जीवनातून विरंगुळा मिळाल्यामुळे मनस्वास्थ लाभेल. आपले आवडते छंद जोपासाल विद्यार्थी वर्गाला नशिबाची चांगली साथ लाभेल. स्पर्धा परीक्षांतून चांगली यशप्राप्ती होईल. आपल्या इच्छा, आकांक्षा कृतीत आल्यामुळे समाधान लाभेल. संततीच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. नवपरिणीतांना गोड बातमीची चाहूल लागेल.
कन्या : आपल्या मताशी ठाम राहीलात तर परिस्थितीशी जुळवून घेणे साेपे जाईल. प्रतिष्ठीत व्यक्तीच्या ओळखीतून कामे मार्गी लागतील. नवी दिशा सापडेल. नवीन करार होतील. आपला आत्मविश्वास व मनाेबल उंचावेल. एखाद्या संघटनेच्या नेतृत्वाची जबाबदारी स्विकारावी लागेल. कर्जवसुली होईल. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. तुमच्या कार्यक्षेत्रात प्रसिद्धी लाभेल. आपल्या बुद्धीचातुर्यावर मोठी मजल माराल. अधिकारावर असणाऱ्या स्त्री व्यक्तीकडून आपले लांबलेले काम होईल. आपण केलेल्या कामाची वरिष्ठांकडून प्रशंसा होईल. प्रतिष्ठीत बड्या व्यक्तींचे सहकार्य लाभेल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना चांगल्या संधी लाभतील. नवीन कार्यारंभ होतील. जमाखर्चाच्या बाबतीत मुख्यत्वाने काळजी घ्यावी लागेल. महत्त्वाच्या कागदपत्रांवर सह्या करण्यापूर्वी दहा वेळा विचार करावा. नोकरी-व्यवसायात आलेल्या चांगल्या संधींचा लाभ घेण्याासाठी सतत सतर्क राहणे गरजेचे आहे. भावंडांशी सुसंवाद साधून त्यांचे प्रश्न साेडवावे लागतील. नवादित कवि, कलाकारांना अनेक सुसंधी देईल. व्यावसायीक प्रदर्शनातून चांगला फायदा होईल. लेखक, साहित्यीक, कवी, कलाकार यांना सुसंधी लाभतील. गृहउद्योग अथवा जोडधंद्यातून फायदा होईल.अचनाक सामाजिक क्षेत्रातून सहलीचे बेत आखले जातील. प्रिय व्यक्तिंच्या भेटी होतील. कौटुंबिक शुभ-समारंभाचे आयोजन केले जाईल. मिष्टान्न भाेजनाचे योग
येतील.
तुळ: नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्याला अनुकूल असे ग्रहमान लाभले आहे. आपल्या श्रमाचे योग्य चीज होईल. शुक्र भावंडसाैख्य देणारा राहील. अपेक्षित पत्रव्यवहार होतील. अनुकूल व्यक्तींशी संपर्क साधून व्यवसाय-उद्याेगात यश प्राप्त करुन घ्याल. परप्रांताशी व्यावसायिक संबंध सुधारतील. घरासाठी आकर्षक खरेदी केली जाईल. वाहन- वास्तूचे योग येतील. घरातील वातावरण आनंदी, उत्साही राहील. नवीन व्यावसायिक करार होतील. सरकारी परवाने मिळतील. कामानिमित्त घडणारे प्रवास सुखाचे घडतील. प्रतिष्ठीत व्यक्तींच्या सहकार्याने रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. नवीन करार होतील. गृहउद्याेग तसेच जोडधंद्यातून चांगले काम मिळेल.मोठठ्याप्रमाणात व्यावसाpयक उलाढाली केल्या जातील. इमारत, बांधकाम खाते, तेल, लाेखंड, जून्या वस्तूंचे व्यापारी या व्यवसायात असणाऱ्या व्यावसायिकांना चांगला अर्थलाभ होईल. व्यवसाय उद्याेगात अभिनवपूरक तंत्र वापरले तर चांगली भरभराट होईल. सकारात्मक विचारांमुळे अनपेक्षित चांगल्या गोष्टी घडतील. कामाच्या विस्ताराचा सतत ध्यास घ्याल. हाती घेतलेल्या कामात
यश लाभेल. काेर्टकचेरीच्या व्यवहारातून लाभ होतील. प्रकृतीसंबंधी काळजी वाटेल. उष्णतेचे विकार, नेत्रविकारांचा त्रास उद्भवू शकतो. आपल्या व्यक्तीमत्त्वाचा चांगला ठसा उमटवाल.
वृश्चिक : नोकरीत पदाेन्नती होऊन आवक वाढणार आहे. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांची ओळखीतून कामे मार्गी लागतील. व्यावसायिक प्रदर्शने भरविता येतील. जून्या मिळालेल्या ऑर्डर्समध्ये वाढ झाल्यामुळे कामाचा विस्तार होईल. आपली सामाजिक पतप्रतिष्ठा उंचावेल. नावीण्यपूर्ण कलाकृतींचा ध्यास घ्याल. व्यवसाय वृद्धींगत करण्याच्यादृष्टीने मोठ्या प्रमाणावर उलाढाली केल्या जातील. कामाच्या जबाबदाऱ्या वाढतील. स्पर्धात्मक कार्यात आपण आघाडीवर राहणार आहात.व्यवसाय उद्याेगाच्या निमित्ताने देशातील तसेच परदेशातील संस्थांशी संपर्क साधण्यात यशस्वी व्हाल. काेणाकडूनही आपले काम होईल अशी अपेक्षा बाळगू नका. स्वतःचे काम स्वतःच करावे. इच्छापूर्ती होईल.मित्रपरिवाराचे चांगले सहकार्य लाभेल. सांस्कृतिक कार्यक्रमातून आनंद घ्याल. गुंतवणूकीतून लाभ होतील. घरातील व्यक्तींच्या मतांना दुजोरा दिलात तर आपला फायदा होईल. माैल्यवान वस्तूंची खरेदी कराल. अंधश्रदधेला बळी पडू नका. मन सैरभैर होणार्या घटना घडतील. वाहन चालविताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे. काेणत्याही प्रलाेभनांना बळी पडू नका. प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करु नका. मधुमेह असणाऱ्यांनी प्रकृतीची जास्त काळजी घ्यावी.
धनुः हे नवीन वर्ष आपणांसाठी उत्कर्ष घेऊन येणारे राहील. रवि-बुध व्यवसाय उद्याेगातून भागीदाराचे चांगले सहकार्य देणारे राहतील. तरुणांना नोकरी-व्यवसायात द्विधा मनःस्थितीत ठेवणारा राहील. महत्त्वाचे निर्णय घेताना योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन घ्यावे, नाहीतर फसवणूक होण्याची शक्यता राहते अथवा चुकीचे निर्णय घेतले गेल्याने नुकसान होण्याची शक्यता राहते. शुक्रामुळे आपल्याला आर्थिक लाभ होतील. जूनी येणी वसूल होतील. आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल. भविष्यकाळाच्यादृष्टीने आदिक तजवीज करु शकाल. वडीलाेपार्जित इस्टेटीतून लाभ होतील. उद्याेग-व्यवसायातमोठठ्या प्रमाणात उलाढाल केली जाईल. व्यवसाय- उद्याेगातील मह्त्त्वाच्या कामातून चांगले यश लाभेल, त्यामुळे मानसिक समाधान लाभणार आहे. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना सुसंधी लाभतील. तसेच नोकरीत पदाेन्नती मिळेल. सामाजिक, राजकीय क्षेत्रात आपल्या व्यक्तिमत्त्वाचा चांगला ठसा उमटवाल. सतत प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचे योग येतील. नवीन रचनात्मक कलाकृतींचा ध्यास घ्याल. विवाहेच्छूक तरुणांचे विवाह ठरतील. कौटुंबिक शुभ-समारंभाचे आयोजन केले जाईल. मिष्टान्न भाेजनाचे योग येतील. भावंडांसंबंधीची चांगली वार्ता कानी येईल. भावंडांशी सुसंवाद साधाल. अविस्मरणीय घटना घडतील.
मकर: ग्रहमान आपणांस अतिशय अनुकूल फलदायी आहे. हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश लाभणार आहे. महत्वाचे दस्तऐवज हाती लागतील. आपल्याला अपेक्षित गोष्टी घडल्यामुळे आनंद मिळेल. ज्या बातमीची आपण वाट बघत होता ती बातमी लवकरच आपल्या कानी येईल. कवि, कलाकारांना सुसंधी देणारा काळ आहे. राशीत आलेल्या शुक्रामुळे हाैसेमाैजेखातर खर्च कराल. अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल. व्यावसायिक प्रदर्शनातून फायदा होईल. नशिबाची साथ लाभेल. उंची वस्त्रालंकारांची खरेदी केली जाईल. सामाजिक प्रतिष्ठा वाढविणार्या घटना घडतील. सांसारिक जीवनात आनंद देणार्या घटना घडतील. अचानक सहलीचे आयोजन केले जाईल. स्थावर मालमत्तेचे रेंगाळलेले व्यवहार मार्गी लागतील. तरुणांना हा महिना अत्यंत शुभफलदायी राहील. आत्मविश्वास व मनाेबल उत्तम राहील. रंग, फर्निचर तसेच माैल्यवान वस्तूंचे व्यापारी वर्गासाठी शुक्रभ्रमण अनुकूल फलदायी ठरेल. उद्याेग व्यवसायात मोठ्या प्रमाणात उलाढाल केली जाईल. आत्मपरीक्षणाचा आपल्याला खूप फायदा होईल. आपल्या मतांचा आदर केला जाईल. विद्यार्थ्यांना स्पर्धापरीक्षांतून विशेष यशप्राप्ती लाभेल. चांगल्या शैक्षणीक संधी प्राप्त होतील. सत्संग लाभेल. दैनंदिन कामात थाेडी दगदग झाली तरी त्याचे फळ उत्तम मिळेल.
कुंभ: संततीच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्याल. नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना सुसंधी लाभतील. वरिष्ठ पदावर काही काळ काम करण्याची संधी मिळेल. मनाजोग्या ठिकाणी बदली होईल. भागीदारी व्यवसायातून त्रास होण्याची शक्यता आहे. काेणालाही जामीन राहण्याचे टाळावे. आपले ध्येय गाठण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल. कामाचे पूर्वनियोजन महत्त्वाचे राहील. व्यवसायात जवळच्या नातेवाईकांना सहभागी करून घेणे शक्य असेल तर जरूर करा. नव्या कामाचा प्रस्ताव येईल. व्यवसायीक उद्याेगातील कामानिमित्त कर्ज प्रकरण रखडले असेल तर ते मार्गी लागेल. विवाहेच्छूक तरुणांचे विवाह ठरतील. शनि संशोधनपर अभ्यासक्रमातून यशस्वी करेल. शुक्रामुळे माैल्यवान वस्तूंची खरेदी केली जाईल. साचेबद्ध जीवनातून विरंगुळा मिळावा म्हणून सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घ्याल. अचानक सहलीचे आयोजन केले जाईल. आपल्याला अनपेक्षित खर्च उद्भवणार आहेत. वाहन चालविताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे. यंत्र, शस्त्र तसेच वाहनापासून धाेका संभवतो. काेणत्याही प्रलाेभनांना बळी पडू नका. कुटुंबातील वयस्कर व्यक्तींच्या प्रकृतीची काळजी वाटेल.
मीन: घरात धार्मिक शुभसमारंभाचे आयोजन केले जाईल. हातून पुण्यकर्म घडेल. संतसज्जनांचा सहवास लाभेल. पुढे घडणाऱ्या घटनांची आपल्याला चाहूल लागेल. धार्मिक – आध्यात्मिक प्रगती साधता येईल. नोकरीत वरिष्ठांकडून आपल्यावर कामाची जबाबदारी साेपविली जाईल. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. कामाच्या विस्ताराचा सतत ध्यास घ्याल. धाडसी निर्णय घेतले जातील. उत्साहवर्धक घटना घडल्याने तरुण-तरुणी आनंदात राहतील. नवीन ओळखी होतील. आपल्या कार्यकौशल्यामुळे कार्यक्षेत्रातून आपली प्रशंसा केली जाईल. आपल्या इच्छा, आकांक्षा कृतीत आल्यामुळे समाधान लाभेल. चांगल्या व्यक्तींची भेट होईल. व्यवसाय वृद्धींगत करण्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर आदिक उलाढाली केल्या जातील. आपल्या कर्तृत्वाला चांगली झळाळी मिळेल. व्यवसायिक प्रदर्शनातून चांगला फायदा होईल. आपल्या वक्तृत्त्वावर सभाेवतालच्या व्यक्ती हुरळून जातील. आपले ध्येय साध्य करता येईल. शैक्षणिक क्षेत्रात परदेशातील संस्थांशी संबंध येतील. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून फायदा होईल. कुटुंबात धार्मिक शुभसमारंभाचे आयोजन केले जाईल. घराला बड्या व्यक्तीचे पाय लागतील. जोडीदाराच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. जुने मित्र भेटल्याने मनाेरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. कवि, कलाकार, लेखकांना प्रसिद्धी लाभेल. सामाजिक क्षेत्रातील आपल्या आघाडीच्या नेतृत्वामुळे समाजात प्रतिष्ठा उंचावेल.