मैत्री हे जगातील सर्वात सुंदर आणि अनोखे नाते आहे. पण, प्रत्येकालाच चांगले मित्र किंवा मैत्रीण मिळतात असे नाही. आयुष्यात बऱ्याचदा मित्र-मैत्रिणींची गरज भासते, पण यावेळी साथ देणारे फार कमी जण असतात. बरेच मित्र-मैत्रिणी तुमची संकटात साथ सोडून देतात. याच मैत्रीच्या संगतीत राहून एकतर तुम्ही बिघडता किंवा चांगले घडता. त्यामुळे जसा अनेकजण आयुष्याचा जोडीदार राशी पाहून निवडतात, तसे मित्र-मैत्रिणीही राशी पाहून निवडल्यास ते तुमची आयुष्यभर साथ देतील. राशीनुसार सर्वात चांगला मित्र कोण असू शकतो जाणून घेऊ…

मेष – सिंह

मेष आणि सिंह राशीचे लोक खूप चांगले मित्र होऊ शकतात. जर दोघेही नेहमी एकमेकांच्या सोबत असतील, तर ते आपल्या मित्राला प्रत्येक परिस्थितीचा सामना करण्यासाठी सकारात्मकतेने प्रेरित करतात. मेष आणि सिंह राशीचे मित्र एकमेकांबरोबर खूप प्रामाणिक असतात. ते आपल्या मित्रांचा आदर करतात, यामुळे त्यांच्या मैत्रीचा पाया अधिक मजबूत असतो.

Mangal gochar 2024 The persons of these three zodiac signs
आता पैसाच पैसा! मंगळ ग्रह होणार महाबली; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींचा होणार भाग्योदय अन् मिळणार प्रत्येक कामात यश
venus and saturn conjunction 2024 in marathi
डिसेंबरपर्यंत ‘या’ तीन राशींच्या लोकांना मिळणार बक्कळ पैसा! शुक्र अन् शनिदेवाच्या कृपेने चमकणार नशीब, मानसन्मानात होईल वाढ
Parivartini Ekadashi
परिवर्तनी एकादशीला जुळून आला रवि आणि सर्वार्थ सिद्धी योग! जाणून घ्या तिथी, शुभ मुहुर्त आणि महत्त्व….
13th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१३ सप्टेंबर पंचांग: मनासारखे यश, अनपेक्षित लाभ; सौभाग्य योगात तुम्हाला कोणत्या रूपात लाभणार लक्ष्मीची कृपा? वाचा १२ राशींचे भविष्य
Numerology: Why People Born on 9, 18, and 27 Tend to Be Angry and Cause Self-Loss
‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांच्या नेहमी नाकावर असतो राग, रागाच्या भरात करतात स्वत:चे नुकसान
12th september rashi bhavishya राशी, राशिभविष्य, आजचे राशिभविष्य, राशीवृत्त देणार
१२ सप्टेंबर पंचांग: ‘आयुष्मान योग’ सिंह, कर्कसह ‘या’ राशींचे नशीब पालटणार? बक्कळ धनलाभ तर रखडलेली कामे पूर्ण होणार; वाचा तुमचे भविष्य
Rahu Nakshatra Gochar
राहु कृपेमुळे २०२५ पर्यंत ‘या’ राशींच्या लोकांचे चमकणार नशीब, अचानक होऊ शकतो आर्थिक लाभ
Surya nakshatra parivartan 2024
३० सप्टेंबरपासून पैसाच पैसा! सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाने ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींचे चमकणार भाग्य
shardiya navratri 2024 date time shubh muhurat
Shardiya Navratri 2024 : शारदीय नवरात्री किती तारखेपासून सुरू होत आहे? घ्या जाणून घटस्थापनेचा मुहूर्त आणि पूजा विधी

मिथुन – तुळ

मिथुन आणि तुळ राशीचे लोक बुद्धिमान असतात, शिवाय त्यांचे बोलणेही खूप प्रेमळ असते. या दोन्ही राशींच्या लोकांची अनेकांबरोबर मैत्री असते. पण, या दोघांच्या मैत्रीची उदाहरणं नेहमी दिली जातात. तसेच वाईट काळातही हे एकमेकांची साथ सोडत नाहीत. या दोघांना अनेक गोष्टींची खूप खोलवर माहिती असते. ते एकमेकांकडून नेहमी नवनवीन गोष्टी शिकून घेतात आणि आयुष्यात पुढे जातात.

कर्क – मीन

कर्क आणि मीन राशीचे मित्र भावनिक पातळीवर एकमेकांशी जोडले जातात. त्यांना त्यांच्या मित्राबद्दल मनापासून सहानुभूती असते. ते एकमेकांना चांगल्याप्रकारे समजून घेतात. त्यांना मित्रांना पाठिंबा देणे आणि त्यांची काळजी घ्यायला आवडते.

वृषभ – कन्या

वृषभ आणि कन्या राशीच्या लोकांमधील मैत्री अतुलनीय आहे. त्यांची मैत्री विश्वास, विश्वासार्हता आणि एकमेकांबरोबर राहण्याच्या ओढीवर अगदी मजबूत टिकून आहे. या राशीचे मित्र आयुष्यभर चांगल्या आणि वाईट काळातही त्यांच्या मित्राची साथ सोडत नाही, काहीही होऊ दे ते आपली मैत्री टिकवतात.

धनु- कुंभ

धनु आणि कुंभ राशीचे लोक स्वतंत्र आणि मोकळ्या मनाचे असतात. ते त्यांच्या मित्राच्या स्वातंत्र्याला खूप महत्त्व देतात. ते एकमेकांना त्यांच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि यश मिळवण्यासाठी प्रेरित करतात.