लग्न झालंय की नाही? सिंगल की कमिटेड? या दोन्ही प्रश्नांची उत्तर नकारार्थी, म्हणजे लग्न नाही, कमिटेड नाही, अशी असतील तर लोकांच्या भुवया उंचावतात. सिंगल म्हटल्यावर तुमच्याकडे करुणेने, अनुकंपेने बघणाऱ्यांची संख्या जास्त असते. आयुष्य जगण्यासाठी आपल्याला एका जोडीदाराची गरज असते, असं अनेकांना वाटत असतं. जोडीदाराशिवाय आपण आयुष्यच जगू शकणार नाही, असाही अनेकांचा समज असतो. जोडीदारामुळे आयुष्यात काही सकारात्मक गोष्टी घडतात आणि आयुष्य अधिक सुंदर होतं. हे खरं असलं तरी, आपल्या आवतीभवती अशाही राशीची काही लोकं आहेत, जी जाणीवपूर्वक सिंगल राहणं पसंत करतात. तुम्ही या श्रेणीत येता की नाही असा प्रश्न तुम्हाला पडत असेल, तर या राशींची ही यादी नक्की बघा.
वृषभ –
वृषभ राशीचे लोक आपली मित्रमंडळी आणि कुटुंबीय, नातेवाईक या सर्वांशी उत्तम संबंध ठेवणं पसंत करतात. चैनीचे जीवन जगता यावे म्हणून ते सतत हार्डवर्क करत असतात. त्यांना त्यांच्या इच्छेनुसार भरभरून जगायला आवडतं.
सिंह –
सिंह राशीचे लोक खूप स्वाभीमानी असतात. त्यांना त्यांचा सेल्फ रिस्पेक्ट खूप प्रिय असतो. त्यामुळे ज्यांना त्यांची किंमत कळत नाही त्या लोकांपासून हे लांब राहतात. या राशीच्या लोकांना जर त्यांच्या मनासारखा लाइफ पार्टनर मिळत नसेल तर ते जबरदस्ती कोणतेही संबंध प्रस्थापित करत नाहीत.
कन्या –
कन्या राशीचे लोक हे नातेसंबंधांसाठी जास्त वेळ देत नाहीत. ते अविवाहित राहणे पसंत करतात, जेणेकरून ते त्यांच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करू शकतील. ते स्वतःला प्रेमाने विचलित होऊ देत नाहीत. ते एखाद्यावर दाखवण्यापुरते प्रेम करू शकत नाहीत. म्हणून खऱ्या प्रेमाची वाट बघतात.
तूळ –
या राशीच्या व्यक्ती स्वतःवर मनापासून प्रेम करतातआणि स्वत:ला पसंत करतात. दुसऱ्यावर प्रेम करण्याआधी स्वत:वर प्रेम करा या विचारसरणीचे हे लोक असतात. स्वत:च्या गरजा आणि ध्येयाला ते प्राधान्य देतात.
मकर –
या राशीचे लोक खूप हाय स्टँडर्ड असतात. ते त्यांचा जास्तीत जास्त वेळ त्यांच्या कामावर आणि ध्येयाला देतात. हे लोक कधीही कोणावर अवलंबून नसतात. या लोकांचा स्वतःवर खूप आत्मविश्वास असतो. या राशीचे लोक त्यांचे वैयक्तिक आयुष्य खूप खाजगी ठेवतात.
हेही वाचा – १२ वर्षांनी शनीनंतर आज गुरूचे मोठे गोचर; वर्षभरात ‘या’ राशींना कष्ट, कोणत्या राशी होणार करोडपती?
या राशीचे लोक कधीही एकटे राहू शकत नाहीत –
मेष, मिथुन, कर्क, वृश्चिक, धनु, कुंभ आणि मीन राशीच्या एकटे राहण्याचा त्रास होतो. हे लोक एकटे राहू शकत नाही. या व्यक्तींना सतत कोणाचा तरी सहवास हवा असतो, नातेसंबंध जपण्यातही हे लोक पुढे असतात.