साप्ताहिक राशिभविष्य

aries
मेष( २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२४ )

मेष : बदल स्वीकारा

त्रिपुरारी पौर्णिमा तुमच्या राशीतूनच होत आहे. हा दिवस शुभ जाईल. दिनांक १२, १३ हे दोन दिवस चांगले कसे जातील ते पाहा. कारण या दिवसांत तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा पटकन राग येईल आणि त्यामुळे तुम्ही स्पष्ट प्रतिक्रिया व्यक्त कराल. यामुळे वादविवाद वाढू शकतात; तेव्हा रागावर नियंत्रण ठेवा. इतरांच्या वैयक्तिक गोष्टीत हस्तक्षेप करू नका म्हणजे त्रास होणार नाही. बाकी दिवस चांगले असतील. व्यवसायात चाललेल्या घडामोडी सध्या तरी चांगल्या असतील. मात्र गुंतवणूक टाळा. नोकरदार वर्गाने कामामध्ये झालेला बदल स्वीकारा. आर्थिक ताणतणाव येणार नाही याची काळजी घ्या. समाजसेवा करताना भान ठेवा. मित्र-मैत्रिणींशी जपून व्यवहार करा. मुलांसाठी वेळ द्यावा लागेल. घरगुती वातावरण ठीक राहील. योगसाधनेला महत्त्व द्या.

शुभ दिनांक : १४, १५

महिलांसाठी : कोणालाही वचन देऊ नका.

taurus
वृषभ( २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२४ )

वृषभ : प्रगती होईल

त्रिपुरारी पौर्णिमा तुमच्या व्ययस्थानातून होत आहे, तेव्हा या दिवशी संयम ठेवूनच काम करावे लागेल. दिनांक १४, १५ हे दोन दिवस म्हणावे असे चांगले नाहीत. म्हणजे या दोन दिवसांत आपण जे करायला जाऊ त्याच्या उलट होईल. त्यामुळे तुमची चिडचिड होईल. तेव्हा नियोजनात्मक गोष्टींवर भर द्या. म्हणजे गोंधळ होणार नाही. एखाद्या कामाला उशीर लागला तरी चालेल, मात्र त्याचा आराखडा तयार करा. कोणाच्या वागण्याबोलण्याकडे लक्ष देऊ नका. बाकी दिवस चांगले असतील. व्यवसायात प्रगती होईल. नोकरदार वर्गाचे कामकाज सुरळीत चालू राहील. आर्थिक नियोजन मार्गी लागेल. राजकीय क्षेत्रात शुभेच्छा मिळतील. मित्रपरिवाराला मदत कराल. उपासना फलद्रूप होईल. आरोग्याची काळजी घ्या.

शुभ दिनांक : १२, १३

महिलांसाठी : ठरवून ठेवलेले काम पूर्ण होईल.

gemini
मिथुन( २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२४ )

मिथुन : प्रतिष्ठा वाढेल

त्रिपुरारी पौर्णिमा लाभस्थानातून होत आहे. नक्कीच या दिवशी लाभ झाल्याशिवाय राहणार नाही. १६ तारखेचा एकच दिवस सोडला तर बाकी दिवसांचा कालावधी उत्तम राहील. सध्या शुभ ग्रहांची साथ चांगली असेल. कोणत्याही कामात अडथळा येणार नाही, त्यामुळे काम करायला उत्साह वाढेल. इतरांनी मदत करावी ही अपेक्षा राहणार नाही. चांगले प्रस्ताव समोर येतील. हे प्रस्ताव स्वीकारायला हरकत नाही. कारण आलेली ही एक चांगली संधी आहे. आतापर्यंत ज्या कामाचा श्रीगणेशा होत नव्हता तो होईल. व्यवसायातील संघर्षदायक वातावरण कमी होईल. नोकरदार वर्गाला कामाचे नवीन स्वरूप कळेल. आर्थिक लाभ होईल. समाजमाध्यमांद्वारे प्रतिष्ठा वाढेल. मित्र-मैत्रिणींची करमणूक होईल. संततिसौख्य लाभेल. घरगुती वातावरण आनंदी राहील. आरोग्य साथ देईल.

शुभ दिनांक : १०, १४

महिलांसाठी : कामे वेळेत पूर्ण होतील.

Cancer
कर्क( २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२४ )

कर्क : शुभ सप्ताह

त्रिपुरारी पौर्णिमा सर्वांसोबत अगदी आनंदाने साजरी कराल. हा एक दिवस तुमच्यासाठी उत्साह वाढवणारा असेल. ११ तारखेचा एकच दिवस सोडला तर बाकी दिवसांचा कालावधी उत्तम असेल. बाकी दिवसांच्या कालावधीत चंद्रग्रहाचे भ्रमण भाग्यस्थानातून लाभस्थानाकडे होत आहे. चांगल्या दिवसांमध्ये चांगले बदल पटकन होतात त्याचा अनुभव येईल. सध्या आपले दिवस चांगले आहेत हे मात्र खरेच असेल. व्यवसायातील आवक वाढेल. नोकरदार वर्गांच्या कामातील त्रुटी दूर होतील. आर्थिक सफलता मिळेल. राजकीय क्षेत्रात यश मिळेल. मित्र-मैत्रिणींशी बऱ्याच दिवसांतून भेटीगाठी झाल्यामुळे मोठा आनंद वाटेल. मुलांसोबत करमणूक होईल. धार्मिक गोष्टीत सहभाग राहील. एकूण सप्ताह शुभ असेल. आरोग्य उत्तम राहील.

शुभ दिनांक : १२, १६

महिलांसाठी : वाटचाल सहज-सोपी राहील.

leo
सिंह( २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२४ )

सिंह : व्यवहार पूर्ण होतील

त्रिपुरारी पौर्णिमा भाग्योदयाची असेल. दिनांक १२, १३ हे दोन दिवस एक घाव दोन तुकडे असे करून चालणार नाही. असे दिवस असले की कोणताही निर्णय चुकण्याची शक्यता असते, त्यामुळे महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा करू नका. नकारात्मक विचार करणे टाळा. प्रत्येक गोष्टीत माझेच खरे, मीच बरोबर असे करून चालणार नाही. सध्या समोरच्याचेही ऐकून घ्यावे लागेल. शांतपणाने स्थिती हाताळण्याचा प्रयत्न करा म्हणजे त्रास होणार नाही. बाकी दिवस चांगले असतील. व्यवसायातील परिश्रम वाढले तरी फायद्याचे प्रमाणही चांगले असेल. नोकरदार वर्गाला कामात यश मिळेल. आर्थिक व्यवहार पूर्ण होतील. सार्वजनिक ठिकाणी वेळ द्यावा लागेल. जोडीदाराची साथ मिळेल. मानसिकता चांगली राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

शुभ दिनांक : १४, १५

महिलांसाठी : मनोरंजनासाठी वेळ काढाल.

gemini
कन्या( २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२४ )

कन्या : सहनशीलता ठेवा

त्रिपुरारी पौर्णिमेदिवशी वादविवादांपासून लांब राहा. शांत राहण्याचा प्रयत्न करा. सध्या चंद्रग्रहाचे भ्रमण षष्ठस्थानातून अष्टमस्थानाकडे होत आहे. म्हणजे दुधात मिठाचाच खडा असे वातावरण असते. त्या वेळी ‘आपले काम भले नि आपण भले’ हे सूत्र लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही. काही गोष्टी अशा असतील की तुम्ही प्रामाणिकपणे जरी बोललात तरी इतरांना त्या गैरसमजाच्याच वाटतील. तेव्हा कोणाला काही बोलायला जाऊ नका. या कालावधीत सहनशीलता ठेवा. व्यवसायात जे चालले आहे ते योग्य आहे असे समजून पुढे चला. नोकरदार वर्गाने कामाकडे लक्ष द्या. आर्थिक बाबतीत योग्य ती खबरदारी घ्या. समाजमाध्यमांचा वापर जेवढ्यास तेवढा करा. कुटुंबाशी एकनिष्ठ राहा. मानसिक ताण घेऊ नका. प्रकृती जपा.

शुभ दिनांक : १३, १६

महिलांसाठी : विचार करून बोला.

libra
तूळ( २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२४ )

तूळ : देहबोली सांभाळा

त्रिपुरारी पौर्णिमा दिवस चांगला जाईल. दिनांक १२, १३, १६ असे हे तीन दिवस सतर्क राहून काम करा. म्हणजे नुकसान होणार नाही. ज्या वेळी ग्रहमान अनुकूल नसते अशाच वेळी तुम्हाला मोह आवरता येत नाही आणि या मोहाच्या पायी नको ते करून बसता. म्हणजेच एक घाव दोन तुकडे करणे त्रासाचे राहील, तेव्हा शांत राहा. एखादी गोष्ट नाही पटली तर ती सोडून द्यायला शिका, यातच तुमचे भले असेल. दोन शब्द जास्त बोलण्यापेक्षा कमी बोललेले केव्हाही चांगले. तेव्हा आपली देहबोली सांभाळा. बाकी दिवस ठीक असतील. व्यवसायात गुंतवणूक टाळा. नोकरदार वर्गाने कामाव्यतिरिक्त इतर गोष्टीत लक्ष घालू नये. आर्थिक व्यवहार जपून करा. कौटुंबिक वादविवाद टाळा. जोडीदाराचा आदर करा. मानसिक शांतता राखा. आहारावर नियंत्रण ठेवा.

शुभ दिनांक : १०, ११

महिलांसाठी : अतिविचार करणे टाळा.

soc
वृश्‍चिक( २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२४ )

वृश्चिक : काटकसर करा

त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे अळीमिळी गुपचिळी असे वातावरण ठेवावे लागेल. एखादी गोष्ट बोलून वाद वाढवण्यापेक्षा ती न बोललेली चांगली हे लक्षात ठेवल्यास पौर्णिमा चांगली जाईल. दिनांक १४, १५ हे दोन दिवस आपल्या कामाव्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टीत लक्ष घालू नका. ज्या ठिकाणी होऊन गेलेल्या गोष्टींवर चर्चा होत असेल अशा ठिकाणी बसूच नका, त्यामुळे कोणत्याच गोष्टी तुमच्या अंगलट येणार नाहीत. अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिका. बाकी दिवस चांगले असतील. व्यवसायातील चढउतारांकडे वेळीच लक्ष द्या. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे प्रोत्साहन मिळेल. आर्थिक काटकसर करा. सार्वजनिक ठिकाणी वेळ द्यावा लागेल. घरगुती वातावरण ठीक कसे राहील ते पाहा. वैवाहिक जीवनात मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्या.प्रकृती जपा.

शुभ दिनांक : १२ , १३

महिलांसाठी : तोंडी व्यवहार टाळा.

Sagi
धनु( २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२४ )

धनू : आठवणींना उजाळा

त्रिपुरारी पौर्णिमेचा आनंद द्विगुणित करणारा असेल. आनंदीमय वातावरण निर्माण होईल. दिनांक १६ रोजीचा एकच दिवस सोडला तर बाकी दिवसांचा कालावधी उत्तम असेल. चांगले दिवस असले की तुम्ही तुमचा हात धुऊन घेता. म्हणजे बाकी राहिलेल्या कामांचा आढावा घेऊन ती कामे पूर्ण करून घेता. मग ते पैशाच्या संदर्भात असो किंवा कामाच्या संदर्भात. काम पूर्ण कसे होईल याकडे तुमचे लक्ष जास्त राहते. शिवाय एका दगडात दोन पक्षी मारण्याचा डावही साध्य करून घेता. सध्या असेच दिवस आहेत. त्रास झाला तरी चालेल, मात्र तुम्हाला तुमचे जे ध्येय गाठायचे आहे ते गाठल्याशिवाय राहणार नाही. व्यवसायातील गुंतवणूक वाढेल. नोकरदार वर्गाचे काम मार्गी लागेल. आर्थिक बचत करणे योग्य राहील. घरगुती वातावरण ठीक राहील. आठवणींना उजाळा मिळेल. आरोग्याची काळजी घ्या.

शुभ दिनांक : १४, १५

महिलांसाठी : महत्त्वाचे करार होतील.

capri
मकर( २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२४ )

मकर : यशस्वी वाटचाल

त्रिपुरारी पौर्णिमा घरातील सर्वांसोबत उत्साहाने साजरी कराल. सप्ताहात सर्व दिवस उत्तम असतील. ज्या वेळी दिवस चांगले असतात अशा वेळी कोणतेही मनोरंजन करायला तुम्ही मागेपुढे पाहात नाहीत. मग तो खर्च कितीही होवो. एकदा मनात आले की ते कार्य तडीस न्यायचे असे तुम्ही ठरवता आणि तसेच होते. तेव्हा या सप्ताहात सध्या यशस्वी वाटचाल राहील. कोणत्याही गोष्टीसाठी संघर्ष करावा लागणार नाही. कटकटीचा कालावधी कमी होईल. कामे अगदी वेळेत होतील. व्यवसायात अनेक मार्गांतून प्रस्ताव येतील. नोकरदार वर्गाला नवीन कामाची आतुरता राहील. आर्थिक लाभ होईल. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील.धार्मिक गोष्टींसाठी खर्च कराल. मानसिक समाधान लाभेल. आरोग्य उत्तम राहील.

शुभ दिनांक : ११, १६

महिलांसाठी : कामाचा दर्जा सुधारेल.

Aqua
कुंभ( २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२४ )

कुंभ : योग्य दिशा मिळेल

त्रिपुरारी पौर्णिमा तेजोमय वातावरणात आनंदाने साजरी कराल. हा दिवस शुभ असेल या सप्ताहात कोणताच असा दिवस नाही की जो अडथळ्यांचा असेल आणि ज्या वेळी असे दिवस असतात, त्या वेळी कामे अगदी भराभर होतात. तेव्हा कशाची वाट पाहता, कामाला सुरुवात करा. इतरांनी मदत करावी ही अपेक्षा बाजूला ठेवा. सध्या जे काही करायचे आहे ते तुम्हाला स्वत:लाच करायचे आहे. त्यासाठी तुम्हाला योग्य दिशा मिळेल. व्यवसायात बाकी राहिलेले व्यवहार पूर्ण होतील. नवीन संधी निर्माण होतील. नोकरदार वर्गाला जबाबदारी घ्यावी लागेल. पैशांचा प्रश्न सुटेल. घरगुती वातावरण चांगले राहील. धार्मिक कार्य पार पाडाल. शारीरिक- मानसिक स्वास्थ्य चांगले राहील.

शुभ दिनांक : १०, ११

महिलांसाठी : सकारात्मक गोष्टी घडतील.

pices
मीन( २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२४ )

मीन : ध्येय गाठाल

त्रिपुरारी पौर्णिमा धनस्थानातून होत आहे. या दिवशी धनलाभ होईल. दिनांक ११ रोजीचा एकच दिवस अनुकूल नाही. बाकी दिवस उत्तम असतील. आतापर्यंत जे ध्येय गाठणे शक्य होत नव्हते, त्या ध्येयापर्यंत नक्कीच पोहचाल. सध्या बरेच काही साध्य करता येईल. नव्या कल्पना सुचतील. सध्या आपल्या कामाव्यतिरिक्त इतर गोष्टीत लक्ष द्यावेसे वाटणार नाही, त्यामुळे कामे मार्गी लागतील. पर्यटन स्थळाला भेट द्याल. प्रशिक्षणाची आवड राहील. व्यावसायिक विकास घडेल. नोकरदार वर्गाला कामात पूर्णपणे लक्ष केंद्रित करावे लागेल. आर्थिकबाबतीत समाधानाची बाब राहील. सामाजिक कार्यात सहभाग राहील. कुटुंबाशी असलेले मतभेद दूर होतील. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. भावंडांची जबाबदारी पार पाडाल. आध्यात्मिक गोष्टींची आवड राहील.आरोग्याच्या तक्रारी दूर होतील.

शुभ दिनांक : १२, १३

महिलांसाठी : संधी प्राप्त होईल.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या