पान गोलाकार असावे की लंबगोलाकार, पसरट असावे की निमुळते, पानाच्या कडा धारदार असाव्या की गुळगुळीत, पानांचा टोकाचा भाग अगदी अणकुचीदार असावा की बोथट, पानाची लांबी, रुंदी, जाडी किती असावी, आणि एखाद्या झाडावर पानांची संख्या किती असावी; या गोष्टी ती वनस्पती कोणत्या परिसंस्थेचा घटक आहे, यावरून ठरतात.