महाराष्ट्र आणि तेलंगण यांच्या सीमेवर, गोदावरी नदीच्या उत्तर किनाऱ्यालगत, पोचमपल्ली नावाचे अगदी छोटेसे गाव आहे. कोलकात्याच्या भारतीय सांख्यिकी संस्थेच्या भूविज्ञान विभागातील वैज्ञानिकांनी १९५८ पासून येथील भूप्रदेशाचे सर्वेक्षण सुरू केले होते. त्याच वर्षी पोचमपल्ली गावाच्या जवळ खडकाच्या थरात डायनोसॉरवर्गीय प्राण्यांच्या अस्थी सापडतात हे त्यांच्या लक्षात आले.