काँक्रीट/ सिमेंटमधील सूक्ष्म भेगा भरून काढण्यासाठी जिवाणूंचा वापर करता येऊ शकतो, हे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ जाणतात. डोळय़ांना सहज न दिसणाऱ्या काँक्रीटमधील भेगांमध्ये पोहोचण्यासाठी हे जिवाणू उत्कृष्ट माध्यम आहेत. भिंतींमध्ये मुरणाऱ्या पाण्याला रोखणे आणि भेगांवरील उपायांसाठी युरियाचे अपघटन करणाऱ्या आणि कॅल्शिअम काबरेनेटचे निक्षेपण करणाऱ्या जिवाणूंचा वापर केला जातो.