औरंगाबादमधील परिस्थिती दिवसागणिक चिंताजनक होत चालली आहे. जिल्ह्यात आज, शुक्रवारी ४६ रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या करोनाबाधितांची एकूण संख्या १४५३ झाल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे. ९०१ जणांनी करोनावर मात केली आहे तर आतापर्यंत ६८ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आता जिल्ह्यात ४८४ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले. गुरूवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये १४ महिला आणि ३२ पुरुष रुग्णांचा समावेश आहे.
ज्या वस्त्यांमध्ये करोना रुग्णांचे प्रमाण अधिक असे त्यावर नियंत्रण मिळविण्यात काही प्रमाणात यश येत आहे. रामनगर भागात ५४ करोनाबाधितांपैकी ४३ करोनाबाधित रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहेत. शहरातील २३ वसाहतीमधील रुग्णसंख्या आता शुन्यावर आली आहे. रेल्वे स्थानकाजवळील हमालवाडी परिसरात गुरुवारी सर्वाधिक चार रुग्ण आढळून आले आहेत. याशिवाय २४ वसाहतीमध्ये एक व दोन रुग्ण आढळून आले आहेत. तसेच नारळीबाग या भागातही तीन रुग्ण आढळून आले. रुग्णसंख्या नव्या भागात वाढत असली तरी त्याचा वेग कमी झाला आहे. करोनामुक्त होण्याचे प्रमाणही आता वाढत आहे.
जिल्ह्यात आज 46 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने कोरोनाबाधितांची संख्या 1453 झाली आहे. यापैकी 901 कोरोनाबधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून 68 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता 484 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.सविस्तर: https://t.co/944vd6EevU pic.twitter.com/INQxLOT9Zi
— District Information office, Aurangabad (@InfoAurangabad) May 29, 2020
शहरातील दाट लोकवस्तीच्या परिसरात अजूनही रुग्ण सापडत आहेत. बायजीपुरा, मिसारवाडी, संजयनगर, वाळूज महानगर, शहागंज, हुसेन कॉलनी, कैलासनगर, रोकडिया हुनुमान, उस्मानपुरा, इटखेडा, एन-४, नाथनगर, बालाजीनगर, साईनगर एन-६, करीम कॉलनी रोशनगेट, अंगुरी बाग, तानाजी चौक बालाजीनगर, या भागात रुग्ण आढळून आले. शहरातील १६० वसाहतींमध्ये करोनाचा शिरकाव झाला आहे.
दरम्यान प्रतिबंधित क्षेत्रात ५० पेक्षा अधिक व्यक्तींचे आजाराबाबतचे सर्वेक्षण करून झाले आहे. आरेफ कॉलनी, सिडको एन वन, सातारा येथील सह्यद्रीनगर, श्रीनिवास कॉलनी, कासलीवाल तारांगण मीटमिटा, पद्मपुरा, अहबाब कॉलनी, बायजीपुरा येथील गल्ली क्रमांक २१ यासह विविध वस्त्यांचा करोना रुग्णांचा आकडा शुन्यावर गेला आहे.
आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. नेहरू नगर, कटकट गेट (1), कैलास नगर, माळी गल्ली (1), एन सहा सिडको (1), भूषण नगर, पहाडे कॉर्नर (1), कैलाश नगर (2), श्रीनिकेतन कॉलनी (1), खडकेश्वर (1), उस्मानपुरा (1), खंडोबा मंदिर, सातारा गाव (2), इटखेडा (3), उस्मानपुरा (3), जुना बाजार (1), विश्रांती कॉलनी एन 2 (3), नारळी बाग गल्ली नं.2 (1), राशेदपुरा, गणेश कॉलनी (1), शिवशंकर कॉलनी, गल्ली नं.1 (1), बायजीपुरा गल्ली नं.2 (1), एन ४ विवेकानंद नगर,सिडको (1), शिवाजी नगर (1), एन सहा संभाजी कॉलनी (1), गजानन नगर एन ११ हडको (5), भवानी नगर, जुना मोंढा (1), जुना बायजीपुरा (2), किराडपुरा (1), रोशनगेट (1), राशीदपुरा (1), मोतीवाला नगर (1), दौलताबाद (2), वाळूज सिडको (2), राम नगर, कन्नड (2) या भागातील कोरानाबाधित आहेत.