बीड तालुक्यातील ईट येथील ८० वर्षीय वृद्ध महिलेचा गळा चिरून खून करण्यात आल्याचा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी तिच्या सावत्र मुलास चौकशीसाठी ताब्यात घेतले, तर शहरात मिस्त्रीकाम करणाऱ्या २५वर्षीय तरुणाच्या निर्घृण खूनप्रकरणी पोलिसांनी २४ तासांत ६ आरोपींना अटक केली. अन्य एक जण फरारी आहे. शहरात लागोपाठ दोन खून झाल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ईट येथील काशीबाई गिरी या वृद्धेचा गळा चिरून खून झाल्याची घटना सकाळी उघडकीस आली. िपपळनेर पोलिसांनी मयत वृद्धेचा सावत्र मुलगा दत्ता साहेबराव गिरी (वय ३२) याला या प्रकरणी ताब्यात घेतले. पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, उपअधीक्षक गणेश गावडे यांनी घटनास्थळी भेट दिली.
दरम्यान, शहरात मिस्त्रीकाम करणाऱ्या जावेद शेख मनू ऊर्फ चंदू (वय २५) या तरुणाचा निर्घृण खून करून, चेहरा छिन्नविछिन्न करण्यात आल्याचे शनिवारी सकाळी उघडकीस आले. पूर्ववैमनस्यातून हा खून करणाऱ्या ७ आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून पोलिसांनी २४ तासांत ६ आरोपींना ताब्यात घेतले. अन्य एक जण फरारी असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. लागोपाठ दोन खून झाल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वृद्ध महिलेचा गळा चिरून खून
८० वर्षीय वृद्ध महिलेचा गळा चिरून खून करण्यात आल्याचा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी तिच्या सावत्र मुलास चौकशीसाठी ताब्यात घेतले
Written by दया ठोंबरे
First published on: 21-12-2015 at 01:50 IST
मराठीतील सर्व अर्थसंकल्प २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Old women murder