छत्रपती संभाजीनगर – एक कोटीची लाच मागणारा बीड पोलीस दलातील आर्थिक गुन्हे शाखेचा पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे याच्या चाणाक्यपुरी येथील घराची झाडाझडती घेतली असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाला घबाड आढळून आले. तब्बल एक कोटी आठ लाख ७६ हजार 528 रुपयांची रोकड, सोन्याची बिस्किटे व दागिने असे ९७० ग्रम असे ७२ लाखांचा ऐवज, साडे पाच किलो चांदी ज्याची अंदाजे किंमत ४ लाख ६२ हजार आहे. याशिवाय बारामती व इंदापूर येथे फ्लॅट, बारामती व परळी येथे प्लॉट व इंदापूर येथे व्यापारी गाळा व इतर मालमत्तेची कागदपत्रे आढळून आली. हे सर्व मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करुण ताब्यात घेण्यात आला आहे .
घरजडती पथक – पोलीस उपअधीक्षक शंकर शिंदे , पोलीस निरीक्षक युनुस शेख अंमलदार भारत गारदे, अविनाश गवळी , हनुमंत गोरे , अमोल खरसाडे, गणेश मेहेत्रे , संतोष राठोड , सुदर्शन निकाळजे यांनी केले. याप्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात लाच गुन्हा याचा गुन्हा आहे. मुख्य आरोपी हरिभाऊ नारायण खाडे हा पसार असल्याने व त्यांचे चाणक्य पुरी बीड येथील किरायाचे राहते घर कुलुप बंद असल्याने १५ मे रोजी सिल बंद करुन पहारेकरी नेमण्यात आले होते. १६मे रोजी विशेष न्यायालय बीड यांचेकडुन सि.आर. पी. सी. कलम १०० नुसार सर्च वॅारंट प्राप्त करुन लोकसेवक हरिभाऊ खाडे यांचे चाणक्य पुरी येथील राहाते घराची पंचा समक्ष घर झडती घेतली असता वरील प्रमाणे मुददेमाल मिळुन आला दरम्यान बुधवारी खाडे याच्या सांगण्यावरून पाच लाच घेताना पकडलेला कुशल जैन याला अटक केल्यानंतर न्यायालयाने त्याला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.