छत्रपती संभाजीनगर : अधिकच्या परताव्याचे आमिष दाखवून २४ गुंतवणूकदारांना एक कोटी ४४ लाक ५० हजार रुपयांना फसवण्यात आले आहे. त्यांच्याप्रमाणेच फसगत झालेल्या गुंतवणूकदारांची संख्या ७०० ते ८०० असून, यातून कोट्यवधी रुपये आरोपींनी लुटल्याच्या संदर्भाने वेदांतनगर पोलीस ठाण्यात येथील अहिल्याबाई होळकर चौकातील निफ्टी गुरुजी शेअर मार्केट क्लासेसच्या ठिकाणी राहणाऱ्या दोघांसह पश्चिम बंगाल, गुजरातमधील मिळून आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुभाष भास्कर तौर (वय २७) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पश्चिम बंगालमधील जियायूर रहेमान, गुजरातमधील सोनल भक्ता, सौमित्र सिन्हा, सौरव अधिकारी, सेजल मेगजी देसर चंद्रा, दिलीपकुमार मैती, विनोद त्रिंबक साळवे, विनाेद बाळासाहेब माने (दोघेही रा. निफ्टी क्लासेस) यांच्याविरुद्ध १९ फेब्रुवारी रोजी दुपारी गुन्हा दाखल झाला आहे.

यातील विनोद माने हे महाराष्ट्र प्रमुख तर विनोद साळवे शाखा प्रमुख आहेत, असे तक्रारीत म्हटले आहे. आरोपींनी ऑगस्ट २०२२ ते जून २०२३ या दरम्यान, निफ्टी गुरुजी शेअर मार्केट क्लासेस येथे संगणमत करून व कट रचून गुंतवणूक रकमेवर चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून सुभाष तौर यांच्यासह २४ गुंतवणूकदारांची मूळ रक्कम एक कोटी ४४ लाख ५० हजार व त्यावरील परताव्याच्या व्याजासह आर्थिक फसवणूक केली. तसेच तक्रारदारांसह कंपनीने जवळपास ७०० ते ८०० गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

Story img Loader