टंचाईग्रस्त भागात जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतर जिल्ह्यात आजपर्यंत २५ छावण्यांना मंजुरी देण्यात आली. यात लहानमोठी ५ हजार जनावरे दाखल झाली आहेत. या जनावरांवर प्रतिदिन साडेतीन लाख रुपयांचा खर्च होत आहे. ग्रामीण भागातून अजूनही छावण्यांसंदर्भात प्रस्ताव येत असून छावण्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात दुष्काळी स्थितीमुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. राज्य सरकारने २० ऑगस्टला जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्यास परवानगी दिली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाकडे ११ तालुक्यांमधून अनेक संस्थांनी छावण्यांसाठी प्रस्ताव दाखल केले होते. प्रस्तावांची छाननी केल्यानंतर १ सप्टेंबरपासून प्रत्यक्ष छावण्या सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली.
जिल्ह्यात २५ छावण्या सुरू आहेत. बीड तालुक्यातील पाली, पालवण, िलबागणेश, बहिरवाडी, खापरपांगरी, आष्टी तालुक्यात धामणगाव, मुर्शदपूर, कर्हेवडगाव व दौलावडगाव. शिरूर तालुक्यात मानूर, उकिरडा व जाटनांदूर. पाटोदा तालुक्यात पाटोदा, केज तालुक्यात राजेगाव, अंबाजोगाई तालुक्यात वरवटी, माजलगाव तालुक्यात पात्रुड, वडवणी तालुक्यातील वडवणी, गेवराई तालुक्यात उक्कडिपप्री, या ठिकाणी छावण्यांना मंजुरी मिळाली. पकी पालवण, कर्हेवडगाव, उकीरडा, पात्रुड, वडवणी, उक्कडिपप्री येथील छावण्या सुरू झाल्या आहेत. या छावण्यांमध्ये ५ हजार जनावरे दाखल आहेत. ५ सप्टेंबपर्यंत १७ छावण्यांना मंजुरी मिळाली. यात ५०० लहान, तर ४ हजार १४१ मोठी जनावरे आहेत. दोन दिवसांमध्ये आणखी सात छावण्यांची भर पडली. लहान जनावरांवर प्रतिदिन ३५ रुपये, तर मोठय़ा जनावरांवर ७० रुपये खर्च केले जात आहेत. आजपर्यंत दाखल जनावरांवर प्रतिदिन साडेतीन लाख रुपयांचा खर्च होत आहे. प्रत्येक छावणीच्या ठिकाणी चाऱ्याबरोबरच पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. जनावरांच्या आरोग्य तपासणीसाठी पशुसंवर्धन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. छावणी योग्य पद्धतीने सुरू आहे की नाही? नोंद केल्याप्रमाणे जनावरे दाखल आहेत का? याची अधिकाऱ्यांमार्फत तपासणी करण्यात येत आहे. स्वत: जिल्हाधिकारी नवलकिशोर राम छावणीला भेट देत आहेत. कोणत्याही प्रकारे गरप्रकार होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासन काळजी घेत आहे. छावण्यांना मंजुरी मिळून प्रत्यक्षात सुरुवात झाली असली, तरी अनेक ठिकाणी जनावरेच दाखल झाली नाहीत, असे चित्र पाहायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा