छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील आपतगाव येथे गणेश काकासाहेब कुबेर (वय २८) यांनी गुरुवारी दुपारी गळफास लावून आत्महत्या केली, अशी माहिती चिकलठाणा पोलीस ठाण्याचे निरीक्षक खांडकेकर यांनी दिली. शेती करणारे गणेश कुबेर यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आत्महत्या करत असून, जो पर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आपल्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करू नका, असा संदेश घरातील मुलांना शिकवण्यात येणार्‍या फलकावर लिहिल्याचे आढळून आले. गणेश यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन लहान मुले, असा परिवार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तरुणांचे आंदोलन

मराठा समाजाच्या मागणीसाठी ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. गुरुवारी सकाळी छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर चढून चार ते पाच तरुणांनी जोरदार घोषणाबाजी करत मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी केली. सिटी चौक पोलिसांनी घोषणाबाजी करणार्‍या तरुणांना ताब्यात घेतले. त्यांना बराचवेळ पोलिसांच्या एका मोठ्या वाहनात बसवून ठेवले. नंतर त्यांना सोडून देण्यात आले.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 28 year old farmer commits suicide in chhatrapati sambhaji nagar for maratha reservation scj
First published on: 26-10-2023 at 21:07 IST