मागील चार दिवसांपासून शहरात थंडी वाढली असून, आज पारा ८.०६ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरला. चार दिवसांपूर्वी काढण्यात आलेले गरम कपडे दिवसभर अंगावर ठेवण्याची वेळ औरंगाबादकरांवर आली. काल शुक्रवारी ९ अंशावर असणारा पारा आज पुन्हा घसरला.
थंडी वाढल्यामुळे विषाणुजन्य आजाराचे प्रमाण वाढू लागले आहे. घसा खवखवणे व सर्दीच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. हुडहुडी भरविणारी थंडी असणाऱ्यांना पहाटे फिरायला जाणाऱ्यांच्या संख्येत घट झाली. वृद्ध आणि लहान मुलांना थंडीपासून वाचविण्यासाठी हे मुख्य काम होऊन बसले. आणखी काही दिवस अशाच पद्धतीचे तापमान असेल, असे वेधशाळेतून सांगण्यात आले. नांदेड जिल्हय़ातील पारा घसरलेलाच होता. आज सकाळी नांदेडचे तापमान ४.०५ अंश एवढे नोंदविले गेले. उस्मानाबाद जिल्हय़ातील किमान तापमानाची नोंद ८.०६ एवढीच होती. संपूर्ण मराठवाडाच गारठला आहे.

Story img Loader