मागील ७ वर्षांपासून जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीमुळे शेतकऱ्यांचे आíथक गणित पुरते कोलमडून गेले आहे. त्यातच दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. दुष्काळाचे चटके आता शेतकऱ्यांच्या पाल्यांनाही बसत असून विद्यापीठाच्या विविध शाखांच्या परीक्षा सुरू आहेत. मात्र, यात परीक्षा शुल्क भरण्यास पसे नसल्यामुळे कळंब तालुक्यातील ४१० विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिल्याचे निदर्शनास आले आहे.
मराठवाडय़ात सध्या भीषण दुष्काळ आहे. शेतकरी आत्महत्येचे सत्र कमी होता होत नाही. जिल्ह्यात सुमारे ११० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. दुष्काळाचे चटके आता शेतकऱ्यांच्या पाल्यांनाही बसत आहेत. कळंब तालुक्यातील मंगरूळ येथील गोकुळ डुकरे या विद्यार्थ्यांकडे परीक्षेचे शुल्क भरण्यासाठी पसे नसल्यामुळे विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना ताजी आहे. सध्या विध्यापीठाच्या विविध शाखांच्या पदवी परीक्षा सुरू आहेत. शिक्षणमहर्षी ज्ञानदेव महाविद्यालयात एकूण १ हजार ४०० विद्यार्थ्यांनी पदवीसाठी प्रवेश घेतला. यातील २८५ विद्यार्थ्यांकडे पसे नसल्यामुळे त्यांना परीक्षा शुल्क भरता आले नाही. तसेच कळंब येथील छत्रपती शिवाजीमहाराज महाविद्यालयात ८४४ विद्यार्थ्यांनी पदवी प्रवेश घेतला होता. पकी १२५ विद्यार्थ्यांकडे पसे नसल्यामुळे या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क भरता आले नाही. त्यामुळे या दोन महाविद्यालयांतील एकूण ४१० विद्यार्थी पदवी परीक्षेला बसू शकले नाहीत. त्यामुळे त्यांचे चालू शैक्षणिक वर्ष वाया जाणार आहे.
राज्य सरकारकडून परीक्षा शुल्क माफ करण्याची केवळ घोषणा करण्यात आली. यावर अजूनही अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे ही घोषणा फसवीच असल्याचे विद्यार्थी बोलत आहेत.
सरकारची नुसतीच घोषणा !
सरकारने शुल्क माफ करण्याची घोषणा केली; परंतु तत्काळ त्या-त्या विद्यापीठांना या रकमेचे वितरण करणे गरजेचे होते. तसे झाले नाही. शिक्षणमहर्षी ज्ञानदेव महाविद्यालयातील २८५ विद्यार्थ्यांनी पसे नसल्यामुळे परीक्षा फार्म भरले नाहीत. मी स्वत: विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक व कुलगुरू यांच्याशी संपर्क करून परीक्षा फार्मचे विलंब शुल्क व अतिविलंब शुल्क कमी करण्याची विनंती केली. त्यांनी ती मान्यही केली. परंतु तरीही केवळ पसे नसल्यामुळे या भागातील विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले. मराठवाडय़ात जवळपास ३ हजार विद्यार्थ्यांना परीक्षेस बसता आले नाही, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्राचे संचालक प्राचार्य डॉ. अशोक मोहेकर यांनी सांगितले.
दुष्काळात परीक्षा शुल्क भरता न आल्याने कळंबचे ४१० विद्यार्थी परीक्षेपासून वंचित!
मागील ७ वर्षांपासून जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीमुळे शेतकऱ्यांचे आíथक गणित पुरते कोलमडून गेले आहे.
Written by बबन मिंडे
Updated:

First published on: 16-10-2015 at 01:20 IST
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 410 student denuded in examination due to without fee