लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर: तीन चाकी ईव्ही वाहन निर्मिती उद्योगात बजाज कडून ४५० ते ५००कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक या वर्षभरात केली जाणार आहे. औरंगाबाद शहरातील अस्तित्वात असलेल्या कारखान्यातून तीन चाकी ऑटो रिक्षाचे उत्पादन सुरू झाले आहे. नव्या यंत्रणांची आणि ही एका बाजूला सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात ३००-३५० प्रतिदिन उत्पादन क्षमता आता वाढविली जाणार आहे.
आणखी वाचा-भारतीय कंपन्या परदेशात थेट सूचिबद्ध होणार; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती
चाकण येथील बजाजच्या कारखान्यामधून ई व्ही दुचाकी वाहने उत्पादन केले जात असून. त्याची क्षमता प्रतिदिन दहा हजार इथपर्यंत वाढविण्यात आलेली आहे. औरंगाबाद येथे नव्या कारखान्याची ही उभारणी सुरू असून ४५० ते ५०० कोटी रुपयांच्या घरात बजाज कडून या क्षेत्रात गुंतवणूक होत असल्याची माहिती उपाध्यक्ष कैलास झांझरी यांनी दिली. दुचाकी उत्पादनातील बजाज मुळे औरंगाबाद शहरात च्या विकासाला मोठी गती मिळाली होती. त्यामुळेही या नव्या नव्या उत्पादनामुळे विकास प्रक्रियेला अधिक वेग येईल असे मानले जात आहे.