मार्च २०१५ ते १८ या कालावधीत पार पडलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामपंचायतमधील सार्वत्रिक व पोट निवडणूक निकालानंतर एक महिन्याच्या आत आपला निवडणूक खर्च सादर न करणाऱ्या विद्यमान ४८ ग्रामपंचायत सदस्यांचे पद रद्द करण्यात आहे. तर अशा एकुण ७७७ उमेदवारांना पाच वर्षासाठी निवडणूक लढवण्यासाठी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी निर्बंध घातले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

राज्य निवडणूक आयोगाच्या नियमानुार निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांनी प्रचारादरम्यान होणाऱ्या खर्चाचा हिशोब निवडणूक निकाल जाहीर झाल्याच्या किमान एक महिन्याच्या आत सादर करणे करणे हे कायद्याने बंधनकारक आहे. यात पराभूत, अर्ज माघार घेणाऱ्या उमेदवारांना हा नियम लागू असतो. या नियमांचे पालन न करणाऱ्या विद्यमान उमेदवाराचे पद रद्द करण्यात येऊ शकते. किंवा त्याच्यावर पाच वर्ष निवडणूक लढवण्यात निर्बंध लावण्यात येतो.

अशाच कारवाईतून औरंगाबाद जिल्ह्यात मार्च २०१५ ते २०१८ दरम्यान झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक व पोट निवडणूकी दरम्यान निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर आपला निवडणूक खर्च सादर न करणाऱ्या ७७७ उमेदवारांवर पाच वर्षासाठी निवडणूक लढवण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये औरंगाबाद ५८, वैजापूर ८७, कन्नड १२१, सिल्लोड ५१, सोयगाव १८, पैठण १८६,खुलताबाद १३, फुलंब्री ५६, गंगापूर १८७ उमेदवारांचा सामावेश आहे. आणि ४८ विद्यमान सदस्यांचे पद रद्द करण्याची कारवाई जिल्हाधिकारी यांनी केली आहे.यात वैजापूर १३, कन्नड १३, पैठण १, गंगापूर ८, खुलताबाद १३ उमेदवारांचा सामावेश आहे.