लोकसभा निवडणुकीपूर्वी धाराशिव जिल्ह्यात ५०० खाटांच्या रुग्णालयाचे उद्घाटन झाले. त्याला ३६१ कोटी रुपयांचा निधी लागेल, असे अंदाजपत्रक ठरिवण्यात आले. पण तरतूद झाली केवळ एक हजार रुपये. अर्थसंकल्यात अशा अनेक बाबींसाठी निधीच न ठेवल्याचा आरोप शिवसेना आमदार कैलास पाटील आणि खासदार ओम राजे निंबाळकर यांनी केला आहे. अशा प्रकारे निधी दिला गेला तर विकास कसा साध्य होईल, असा प्रश्नही शिवसेना आमदार व खासदारांनी उपस्थित केला आहे.

मराठवाड्याच्या विकासासाठी घेण्यात आलेल्या बैठकीत ४४ हजार कोटी रुपयांवरुन अधिक निधीची घोषणा करण्यात आली. त्यातील अनेक बाबींना निधीच मिळाला नाही. लघू पाटबंधारे विभागातील निधीमध्येही मोठी कपात करण्यात आली असल्याचे आमदार कैलास पाटील आवर्जून सांगतात. विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान देण्यात आलेली सारी आश्वासने आता सरकार विसरले आहे. तुळजापूरमध्ये तालुका न्यायालयाच्या इमारतीसाठीही निधी लागणार होता. पण तरतूद झाली एक हजार रुपये. यामुळे राज्य सरकारला कोणता आणि कसा विकास साधायचा आहे, हेच उमजत नाही असेही आमदार कैलास पाटील म्हणाले.

खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी पीक विमा कंपन्यांना लाभ मिळवून देणारे एक पत्र केंद्र सरकारने रद्द करावे अशी विनंती वारंवार करुनही त्याचा उपयोग झाला नाही. या वर्षात विमा कंपनीस एका जिल्ह्यातून २९७ कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. आर्थिक आघाडीवर तरतूद करताना बरेच गोंधळ सरकारने घातले असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे.

Story img Loader