प्रवासी वाहतूक करणाऱ्या एका खासगी बसने अचानक पेट घेतला. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवित हानी झाली नाही. ही घटना नगर नाक्यावरील केंद्रीय विद्यालयासमोर शनिवारी सकाळी ७.३० च्या सुमारास घडली.
हेही वाचा – बनावट दरपत्रकांच्या आधारे कर्ज योजनांची लूट; बँकांना कोटय़वधीचा गंडा
हेही वाचा – ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप, मनसेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
हिमालया ट्रॅव्हल कंपनीची ही बस पंढरपूरच्या दिशेने इंधन भरण्यासाठी नेण्यात येत होती. बसमध्ये चालक व एक त्याचा सहकारी होता. केंद्रीय विद्यालयासमोर बसने अचानक पेट घेतल्याचे लक्षात आल्यानंतर दोघांनी खाली उड्या घेतल्या व अग्निशमन दलाला माहिती दिली. अग्निशमन दलाच्या पथकाने 2 बंबातून तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मुख्य अग्निशमन अधिकारी आर. के. सुरे यांच्या मार्गदर्शनाखाली, उप अग्निशमन केंद्र अधिकारी मोहन मुंगसे, डी. डी. साळुंके, एल. पी. कोल्हे आदींसह सहकार्यांनी आग आटोक्यात आणली.