छत्रपती संभाजीनगर – आपला धर्म स्वीकारा म्हणत दोघा अल्पवयीन मुलांना बळजबरी केल्याच्या तक्रारीवरून आफ्रिकेतील सुदान येथील एका तरुणाला पोलिसांनी शुक्रवारी दुपारी अटक केली. ओसामा अली युसूफ अहमद (२२, ह.मु शिवछत्रपतीनगर हडको) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीला २६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. बी. पाटील यांनी दिले.
प्रकरणात १५ वर्षीय मुलाने फिर्याद दिली. त्यानुसार, २१ डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास फिर्यादी मुलगा हा जेवण करुन एका जनरल स्टोअर्स जवळ उभ्या असलेल्या मित्राला भेटण्यासाठी गेला होता. त्यावेळी इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील एक व्यक्ती दोघांना बोलवत होता. काही मदत हवी असल्याने फिर्यादी व त्याचा मित्र त्या व्यक्तीच्या घरात गेले. त्यावेळी आरोपी हा हातातील एक पुस्तक मोठ मोठ्याने ओरडून वाचू लागला. फिर्यादीने तुम्हाला काही मदत हवी आहे का असा प्रश्न केला असता, त्याने त्याचे नाव सांगुन रुमचा दरवाजा आतुन लावून घेतला व दोघांना समोर बसण्यास सांगुन पेनाने कागदावर आपला धर्म कबुल करणे की दावत हे असे काही काही लिहून तो कागद जाळून त्याचा धुर दोघांना देवू लागला. त्यावर फिर्यादीने हे चुकीचे आहे, या गोष्टी आम्ही मानत नाहीत, माझा विज्ञानावर विश्वास असल्याचे सांगितले. मात्र आरोपीने तुम्ही धर्म कबुल करा, दावत असल्याचे आरोपी सांगु लागला. त्यानंतर आरोपीने मी जे बोलेल ते तुम्ही माझ्या मागे बोला असे दोघांना सांगितले. मात्र दोघांनी नकार दिला असता आरोपीने मोबाइल हेड फोनचे वायर दुमडून दोघांवर उगारले. त्याचवेळी फिर्यादीने तेथून पळ काढून घर गाठत घरच्यांसह पोलिसांना फोन करुन घडलेला प्रकार सांगितला. प्रकरणात सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.पोलिसांनी तपास केला असता आरोपी हा सुदान देशातील असून तो भारतात शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी व्हीजावर आलेला असल्याचे समोर आले आहे. तसेच आरोपी हा ज्या महाविद्यालयात शिक्षण घेत आहे, त्या महाविद्यालयात तो प्रवेश घेतल्यापासून फक्त एकदा गेल्याची नोंद आहे.
हेही वाचा >>>१०८ टक्के पाऊस, तरीही जिल्हा ‘दुष्काळी’; निकषात बसत नसताना सवलतींसाठी प्रशासनाचा आटापिटा
आरोपीला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, सहाकय सरकारी वकील रवींद्र अवसरमोल यांनी आरोपी हा सुदान देशातील असून त्याचे आणखी कोणी साथीदार आहेत काय, आरोपीला बाहेरील देशातून कोणी मदत करित आहेत काय ? तो शिक्षण घेण्यासाठी आला मात्र तो शिक्षण घेत नसल्याने त्याचा नेमका उद्देश काय आहे ? याचा तपास करायचा आहे. ही घटना दोन समाजात तेढ निर्माण करुन कायदा व सुव्यवस्था निर्माण करणारी असून आरोपीने अशा प्रकारे आणखी काही कृत्य केले आहे का ? याचा देखील तपास बाकी आहे. आरोपी हा भारतात त्याच्या धर्माचा प्रसार करण्यासाठी आला आहे का ? याच्यासह आरोपीचे बँक खाते, मोबाइल तपासयचे असून त्याला देशविघात कृत्य करण्यासाठी कोणी अर्थसहाय्य करते काय ? याचा देखील तपास बाकी असल्याने आरोपीला पोलीस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली.