आपल्या वादग्रस्त विधानांमुळे कायमच चर्चेत असणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळातील नेते अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शिवी दिल्याचा धक्कादायक प्रकार एका मुलाखतीमध्ये घडला आहे. एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने सुप्रिया सुळेंनी केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर सत्तार यांना प्रश्न विचारला असता सत्तार यांनी थेट सुप्रिया सुळेंना कॅमेरासमोरच शिवी घातल्याचं दिसून आलं. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी या विधानासंदर्भात संताप व्यक्त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नक्की वाचा >> अब्दुल सत्तारांकडून सुप्रिया सुळेंना शिवीगाळ: “सत्तेची मस्ती जिरवणार, धडा शिकवल्याशिवाय…”; राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्र्या

औरंगाबादमध्ये ‘लोकशाही’ वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधिंशी बोलताना सत्तार यांना सुप्रिया सुळेंबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तुम्ही सुप्रिया सुळेंना खोके देण्याची ऑफर केल्यावरुन त्यांनी तुमच्याकडे आले असतील खोके म्हणूनच तुम्ही खोके देण्यासाठी तयार झाला आहात, असं म्हटलं आहे. यावर काय सांगाल असं सत्तार यांना विचारण्यात आलं. या प्रश्नावर सत्तार यांनी सुप्रिया सुळेंचा एकेरी उल्लेख करत त्यांना शिवी घातली. “इतकी भिकार** झाली असेल सुप्रिया सुळे तर तिलाही देऊ,” असं उत्तर सत्तार यांनी दिलं.

नक्की वाचा >> Abdul Sattar Abuse Supriya Sule: “…याचा अर्थ आम्ही शिव्या मुकाट्याने…”; आत्याला शिवी देणाऱ्या सत्तार यांना रोहित पवारांचा इशारा

सुप्रिया सुळेंचे पती सदानंद सुळे यांच्या नावाने असलेल्या ट्वीटर हॅण्डलवरुन हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. “या महिलाविरोधी नेत्यांकडून सुप्रियाबद्दल आणि पर्यायाने सर्व महिलांबद्दल वादग्रस्त विधाने सुरुच आहे. पुरुषार्थ सांगणारे हे लोक त्यांच्या वर्तुवणुकीमुळे आणि क्षमतेमुळे उघडे पडले आहेत,” असं सदानंद सुळे यांच्या नावाने असलेल्या अकाऊंटवरुन ट्वीट करण्यात आलं आहे. हे अकाऊंट व्हेरिफाइड नाही.

नक्की वाचा >> सुप्रिया सुळे शिवीगाळ प्रकरण: “तो नेमका कोणत्या धर्माचं…”; इस्लामचा उल्लेख करत आव्हाड अब्दुल सत्तारांवर संतापले

आधी स्वयंपाकघरात जा किंवा इतर कुठेतरी असं म्हटलं गेलं आणि आता कॅबिनेटमध्ये असलेल्या मंत्र्याने केलेलं हे विधान केलं आहे. ही लोक स्वत:ला लोकप्रतिनिधी म्हणतात आणि हे नव्या पुढारलेल्या सरकारचे नेते आहेत, असंही अन्य एका ट्वीटमध्ये म्हटलं आहे. “स्वत:बद्दल सोडून त्यांना इतरांबद्दल आणि महिलांबद्दल काहीही वाटत नाही. सुप्रिया चांगलं काम करत राहा. तुला अधिक शक्ती मिळो. अशा नेत्यांची विचारसणी उघडी पाडणारी महिलाच खरं नेतृत्व असते,” असंही सदानंद सुळेंच्या नावाने असलेल्या या खात्यावरुन केलेल्या तिसऱ्या ट्वीटमध्ये म्हटलंय.

सत्तारांविरोधात कारवाईचे आदेश
सत्तार यांनी केलेल्या विधानाच्या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली असून या तक्रारीसंदर्भात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी माहिती दिली आहे. “राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत अपमानास्पद उद्घार काढल्याची तक्रार राज्य महिला आयोगाकडे प्राप्त झाली आहे. महिलांना अपमानास्पद वागणूक देत, आक्षेपार्ह विधाने करत त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणे, कमी लेखणे, कर्तुत्वहनन करणाऱ्या अशा वक्तव्याची आयोगाने दखल घेतली आहे. याप्रकरणी राज्याचे पोलिस महासंचालकांनी कायदेशीर कारवाई करावी आणि त्याचा अहवाल तात्काळ सादर करावा असे आयोगाकडून सुचना देण्यात आली आहे,” असं चाकणकर यांनी ट्वीटवरुन म्हटलं आहे.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abdul sattar abused supriya sule in front of camera video goes viral scsg
Show comments