खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला होता. श्रीकांत शिंदे यांनी राजा ठाकूर नावाच्या गुंडाला माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी दिली आहे, असं ते म्हणाले होते. यासंदर्भात त्यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही लिहिले. राऊतांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून यावर विविध राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. ते औरंगाबादमध्ये टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलत होते.

हेही वाचा – MPSC ऐवजी ‘निवडणूक आयोग’ असा उल्लेख; CM शिंदेंकडून स्पष्टीकरण; म्हणाले, “दिवसभर…”

salman khan reacted on aishwarya rai abhishek bachchan marriage
ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनशी लग्न केल्यानंतर सलमान खान म्हणालेला, “माझ्या आयुष्याचा एक…”
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Oppositions stole promises along with schemes criticized Eknath Shinde in Ambernath
“विरोधकांनी योजनांसह वचननामाही चोरला…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अंबरनाथमध्ये टीका
sana malik
Sana Malik : “नवाब मलिक तुरुंगात असताना पक्षातील लोकांनी…”, सना मलिक यांचा गंभीर आरोप!
Traders are aggressive due to Sanjay Raut statement Mumbai news
संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे व्यापारी आक्रमक; माफी मागून विधान मागे घ्या, अन्यथा रोषाला सामोरे जा
Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!
Loksatta lokrang A review of the achievements of Maharani Baijabai Shinde
दखल: बायजाबाई यांच्या कर्तृत्वाचा आढावा

काय म्हणाले अब्दुल सत्तार?

श्रीकांत शिंदे हे प्रामाणिक युवा नेता आहेत. अशा व्यक्तीवर आरोप करणं ही राजकीय खेळी आहे. एकनाथ शिंदेच्या यशाला सुरुंग लावून त्यांना बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. श्रीकांत शिंदेंची काम करण्याची पद्धत मी बघितली आहे. ते कधीही सुडाचं राजकारण करत नाहीत. त्यांच्यासारख्या युवा नेत्यावर संजय राऊतांसारख्या मोठ्या नेत्याने आरोप करावा, हे चुकीचं आहे. निश्चितच याचे परिणाम त्यांना भोगवे लागतील, अशी प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी दिली.

हेही वाचा – “पाकिस्तानला घरात घुसून मारलं” कंगनाच्या कौतुकावर जावेद अख्तर म्हणाले, “मी तिला फार…”

पुढे बोलताना त्यांनी निवडणूक आयोगाच्या निकालाबाबतही भाष्य केलं. धनुष्याबाण चिन्ह आम्हाला मिळावे, त्यावर आमचा आधिकार आहे, हे मी यापूर्वीदेखील सांगितलं आहे. निवडणूक आयोगाने जो निर्णय घेतला, तो निर्णय सामान्य शिवसैनकांनाही आवडणारा आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच आमच्या आमदार खासदारांना मिळालेल्या मतांची संख्या पाहिली, तर एकनाथ शिंदेंनी केलेला दावा योग्य होता आणि त्यानुसार निवडणूक आयोगाने दिलेला निर्णयही योग्य आहे, असंही ते म्हणाले.