छत्रपती संभाजीनगर – महिनाभरावर लग्न आलेला नवरदेव, त्याची बहीण व वर्षाची भाची, असे तिघे अपघातात जागीच मृत्यू पावले. मृत दुचाकीवरून लग्नाचा बस्ता खरेदीसाठी जात असताना बसशी अपघात घडला. बीडच्या अंबाजोगाईनजीकच्या वाघाळा पाटीजवळ रविवारी सायंकाळी 7 च्या  सुमारास ही दुर्घटना घडली.

सेवालाल पंडित राठोड (वय २१), दीपाली सुनील जाधव (वय 20) व त्रिशा सुनील जाधव, अशी मृतांची नावे आहेत. लातूर जिल्ह्याच्या बिटरगाव तांड्यावरील रहिवासी असलेल्या सेवालालचा येत्या २८ एप्रिल रोजी विवाह होणार होता. या विवाहाची सध्या जय्यत तयारी सुरू होती. सेवालाल त्याची राडी तांडा (ता. अंबाजोगाई) येथील बहीण दीपालीला व भाची त्रिशाला घेऊन अंबाजोगाईला आला होता.

Story img Loader