छत्रपती संभाजीनगर: पैठण मार्गावरील वाल्मी संस्थे नजीकच्या उड्डानपुलाखाली झालेल्या अनेक वाहनांना धडकण्याच्या विचित्र अपघातात एक ठार तर सात जखमी झाले. जखमींमधील तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक आहे. शुक्रवारी ७.३० च्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली.सोलापूर-धुळे महामार्गावरून वाल्मीनजीकच्या पुलाखालून जाण्यासाठी एक ट्रक सुसाट वेगात उतारावरून आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

चालकाला वेगावर नियंत्रण ठेवता आले नाही आणि ट्रक पाच ते सहा वाहनांना धडकत निघाला. यामध्ये चार ते पाच दुचाकी, दोन-तीन कार, एक रिक्षा अशा वाहनांना धडकला. यामध्ये एक दुचाकी कार व ट्रकमध्ये चिरडली गेली. यातील एक जण ठार झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. इतरही वाहनांवरील माणसे जखमी झाले असून सातपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातानंतर सातारा ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना घाटीमध्ये हलवण्यात आले. पैठण मार्गावर रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहतूक बराचकाळ विस्कळीत झाली होती.