छत्रपती संभाजीनगर – वाळूची तस्करी करणाऱ्या अवैध वाहतूकदारांवर कारवाई करत चार हायवा व दोन जेसीबीसह त्यांच्या चालकांना ताब्यात घेऊन २ कोटी ८०लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दौलताबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आसेगाव शिवारात मंगळवारी रात्री १० नंतर पोलीस उपायुक्त (झोन १) नितीन बगाटे यांच्यासह त्यांच्या पथकातील दोन अधिकारी व चार अंमलदारांनी ही कारवाई केली.

उपायुक्त नितीन बगाटे यांनी सांगितले की, आपण एका खासगी कार्यक्रमात असतानाच आसेगाव शिवारात वाळूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर तातडीने जाऊन रात्री ही कारवाई केली. याबाबत अधिक तपास सुरू आहे.

Story img Loader