मराठवाड्याच्या वाट्याचे पाणी बारामतीत अडवलं होते. ते पाणी पुन्हा मराठवाड्याच्या वाट्याला देण्याचं काम आमचं सरकार आल्यानंतर करत आहे, असं सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पवार कुटुंबाला अप्रत्यक्षपणे लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. याला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “बारामतीचं नाव घेतलं की, वेगळं महत्व प्राप्त होतं. ब्रेकिंग आणि हेडलाईन होते, म्हणून अशी वक्तव्य केली जातात,” असं अजित पवारांनी म्हटलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

“मराठवाड्याच्या वाट्याचं पाणी बारामतीत अडवलं होते, ते पुन्हा मराठवाड्यापर्यंत पोहचवण्याचं काम आमचं सरकार करत आहे. आमचं सरकार असताना कृष्णा प्रकल्पाला निधी देऊन त्याच्या बोगद्याच्या कामाला सुरूवात केली. त्याला सुधारित प्रशासकीय मान्यतेची आवश्यकता होती. पण, अडीच वर्षे महाराष्ट्रातील सरकारने सुधारित प्रशासकीय मान्यतेचा एक शब्दही दिला नाही,” असा आरोप फडणवीसांनी महाविकास आघाडीवर केला आहे.

हेही वाचा : भाजपा-शिंदे गटाच्या वादावर जयंत पाटलांचं भाष्य; म्हणाले, “भाजपाने एकनाथ शिंदेंसमोर गुडघे…”

“विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली…”

यावर अजित पवारांनी सांगितलं, “बारामतीत कोणतेही पाणी अडवलं नाही. कृष्णा-भीमा स्थिरीकरणाच्या संदर्भात देवेंद्र फडणवीसांनी वस्तुस्थिती सांगावी. पाणी देत असताना विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर येथेच बैठका झाल्या. तेव्हा महाराष्ट्र कृष्णा विकास महामंडळच्या अधिकारात येणारं मराठवाड्याचं हक्काचं पाणी, जे उस्मानाबाद आणि बीडला मिळणार आहे, ते त्यांना मिळालं पाहिजे, असा निर्णय झाला.”

हेही वाचा : अयोध्या पौळ यांच्यावरील शाईफेक आणि मारहाणीवर केदार दिघे यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “षडयंत्र रचून…”

“…म्हणून अशी वक्तव्य केली जातात”

“निरेचं पाणी चंद्रभागेस न जाता इंदापूरमधील एका बोगद्याद्वारे उजनीत आलं. उजनीतून उचलून मराठवाड्याच्या हक्काचं पाणी देण्याचा निर्णय झाला. बोगद्याचं काम होण्यास वेळ लागतो. त्यात बारामतीचा प्रश्न आला कुठे. फक्त बारामती नाव घेतलं की, त्याला वेगळं महत्व प्राप्त होते. ब्रेकिंग आणि हेडलाईन होते, म्हणून वक्तव्य केली जातात,” असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar reply devendra fadnavis over baramati comment marathwada krushna water project ssa