छत्रपती संभाजीनगर : दिवंगत प्रमोद महाजन यांची भाषण शैली आणि गोपीनाथ मुंडे यांच्या राजकारणाचा मिलाफ करत आपली राजकीय प्रतिमा चढी ठेवणाऱ्या धनजंय मुंडे यांनी राजीनामा दिला. या प्रकरणामुळे मुंडेंच्या राजकीय कारकिर्दीला धक्का बसला आहे. तर देशमुख हत्या प्रकरणानंतर अराजकाच्या वतुर्ळातील बीडमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीस आम्ही चाप लावू इच्छितो, असा पहिला राजकीय संदेश सरकारकडून दिल्याचे मानले जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आक्रमक बोलणाऱ्या धनंजय मुंडे यांचा तडजोडीच्या राजकारणातील वकुब बीडमध्ये नेहमी चर्चेत असतो. त्यामुळे मुंडे यांचा अजित पवार यांनी पद्धतशीरपणे उपयोग करून घेतला. ‘मराठा नेत्यांचा पक्ष’ अशी राष्ट्रवादीची ओळख पुसण्यासाठी ‘ओबीसी नेते’ अशी त्यांची प्रतिमा राज्यभर निर्माण करण्यात आली. मात्र, देशमुख हत्या प्रकरणानंतर यातील पोकळपणा समोर येऊ लागला. परळीच्या मतदानादरम्यान होणाऱ्या तक्रारी, निवडणूक काळातील न्यायालयीन प्रकरणे यातून बिघडलेल्या बीडचे नेते, अशी धनंजय मुंडे यांची प्रतिमा बनत गेली.

गोपीनाथ मुंडे यांचे वारसरदार म्हणून पंकजा मुंडे यांना पुढे आणले जात असताना धनंजय मुंडे यांनी पक्ष बदलला. ते अखंड राष्ट्रवादीत गेले.

समाजकल्याण मंत्री, विरोधी पक्ष नेता आणि कृषिमंत्रिपदापर्यंत उडी मारणाऱ्या धनंजय मुंडे यांनी बीड जिल्हा प्रशासनात ‘ओबीसी’ चेहरा प्रबळ रहावा असा जाणीवपूर्वक प्रयत्न केला गेला. परिणामी बीड जिल्ह्यात नोकरीत रुजू होण्यास अधिकारी इच्छुक नसतात. राजकीय पातळीवर मुंडे यांनी उभे केलेल्या नेतृत्वामध्ये वाल्मिक कराडचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. त्याने केलेले प्रताप आता संतोष देशमुख हत्या प्रकरणातून पुढे आले आहेत.

‘आमचे आम्हालाच माहीत’

मुंडे घसरत जाणाऱ्या राजकीय प्रतिमेबाबत बोलताना ज्येष्ठ नेते शरद पवार एका मुलाखती दरम्यान म्हणाले होते, ‘त्यांना कोणत्या दिव्यातून बाहेर काढले आहे हे आमचे आम्हाला माहीत, त्यांच्या विषयी मला काही विचारावे एवढे ते महत्त्वाचे नाहीत.’ कधी मुंडे तर कधी पवार यांच्या प्रतिमांचा उपयोग करून घेत धनंजय मुंडे यांनी मात्र राजकारणात अनेक पायऱ्या चढले.