सिंचन प्रश्नावर जिल्हाभरात आरपारच्या लढाई करीत सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला. कयाधु नदीवरील साखळी बंधाऱ्याच्या मुद्दय़ावर आमदारकी ओवाळून टाकीन, असे भाजपाचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी म्हटल्याने आंदोलनाला धार येईल, असे मानले जात आहे. २६ जानेवारी रोजी आंदोलन हाती घेतले जाणार आहे.
सिंचनाच्या प्रश्नावर जिल्हा सिंचन संघर्ष समितीची शुक्रवारी शासकीय विश्रामगृहात बठक झाली. या वेळी राष्ट्रवादीचे माजी खा.शिवाजी माने, भाजपचे आ.तान्हाजी मुटकुळे, शिवसेनेचे माजी आ.गजाननराव घुगे, राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे आदींची उपस्थिती होती.
जिल्ह्याच्या सिंचनाचा अनुशेष शिल्लक असताना अधिकारी मात्र कागदीमेळ घालून हा मुद्दा प्रलंबित ठेवत आहेत. जिल्ह्याला १०५ दलघमी पाणी देणे बाकी आहे. त्याशिवाय सापळीला १९१ दलघमी पाणी लागते. त्यापकी २२ दलघमी पाणीच बॅरेजेस बांधण्यास उपयोगात येईल, असे माजी खासदार शिवाजी माने म्हणाले. कयाधु खोऱ्यातील जनतेचा या पाण्यावर हक्कच नाही. वरिष्ठ अधिकारी शेतकऱ्यांचा विरोध असल्याची खोटी माहिती देत आहेत. यास तोंड फोडण्याची वेळ आली असल्याने या जिल्ह्याच्या सिंचन प्रश्नावर २६ जानेवारी रोजी तीव्र आंदोलनाचा इशाराही माने यांनी दिला.
या प्रश्नी आमदार मुटकुळे आक्रमक होते. ते म्हणाले,‘माझ्या आमदारकीचा पहिला व शेवटचा प्रयत्न सिंचनाच्या मुद्दय़ावर राहणार, ३५ टक्के सिंचन झालेच पाहिजे, अशी माझी भूमिका असून या प्रकरणी राज्यपालांची तीन वेळा भेट घेतली, त्यांना निवेदने दिली. पूर्वी तुम्ही दिलेल्या आश्वासनामुळे माझी आमदारकी कायम आहे, मी नागपूर हिवाळी अधिवेशनातच आमदारकीचा राजीनामा देण्याची तयारी दाखविली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी अश्वासन दिले आहे.’ िहगोली जिल्ह्याचा सिंचनाचा अनुशेष वेगळा काढण्याची गरज असल्याचेही चच्रेत सांगितले असल्याचे ते म्हणाले. कयाधूवरील साखळी बंधाऱ्याचा मुद्दा शासनाने मार्गी न लावल्यास आमदारकीचा त्याग करणार असल्याचे मत आ.मुटकुळे यांनी व्यक्त केले.
१३ जानेवारी रोजी राज्यापालांसमवेत या प्रश्नी बैठक होणार आहे. त्यात काय ठरते यावर आंदोलनाची तीव्रता ठरविली जाणार आहे.

Story img Loader