कुलगुरूंच्या दालनात आंदोलन केल्याचा निषेध
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
औरंगाबाद : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्यासमोरच त्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी काही आंबेडकरी विद्यार्थी संघटनांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ बंदची हाक देत अभाविपवर कारवाईची मागणी केली. कुलगुरूही अभाविपवर कारवाई करण्याऐवजी त्यांनाच पाठीशी घालत असल्याचा आरोपही काही संघटनांनी केला आहे. बंदच्या पाश्र्वभूमीवर आज दिवसभर विद्यापीठात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. दरम्यान, सोमवारच्या आंदोलनानंतर रात्री अभाविपच्या एका कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याची घटना घडली असून याप्रकरणी मंगळवारी सायंकाळपर्यंत कोणतीही तक्रार पुढे आली नसल्यामुळे अभाविपसह इतर विद्यार्थी संघटनांच्या मिळून सहा पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावल्याची माहिती बेगमपुरा पोलीस ठाण्याच्या निरीक्षक राजश्री आडे यांनी दिली.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाशी संबंधित विविध मागण्यांसाठी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या समोरच दालनात ठिय्या आंदोलन केले होते. यावेळी काही आंबेडकरी संघटनाही कुलगुरूंच्या समर्थनार्थ दालनात आल्यानंतर दोन्ही संघटनांमध्ये हाणामारी झाली होती. या पाश्र्वभूमीवर विद्यापीठ बंदची हाक दिली होती. कुलगुरूंनी त्यांच्या दालनात शिरून आंदोलन करण्याला विरोध करायला हवा होता. आंदोलन करायचे तर बाहेर करा, असे कुलगुरूंनीच सुनावणे अपेक्षित होते, उलट कुलगुरूंनी कुठलीही भूमिका घेतली नाही. काही संघटना कुलगुरूंच्या समर्थनार्थ उतरल्या असता उलट डॉ. बी. ए. चोपडे हेच त्यांना समजावत होते. त्यामुळे कुलगुरू दबावात काम करीत असून अभाविपला पाठीशी घालत आहेत, असाही आरोप केला जात असून इतर संघटनांवर यापूर्वी जशी कारवाईची भूमिका विद्यापीठाने घेतली तशी अभाविपवरही कारवाई करावी, अशी मागणी आंबेडकरी विद्यार्थी संघटनांनी बंदच्या दरम्यान केली. आजच्या आंदोलनात बहुजन क्रांती विद्यार्थी मोर्चा, सम्यक विद्यार्थी आंदोलन, एसएफआय, एआयएसएफ, आनंदराज आंबेडकर यांची रिपब्लिकन विद्यार्थी सेना, एनएसयूआय आदी संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाल्याचे बहुजन क्रांतीचे सचिन शिंदे, सचिन निकम यांनी सांगितले.