घर खरेदीत फसवणूकप्रकरणी दाखल गुन्हय़ातील आरोपीला अटक करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच घेताना सिडको पोलीस ठाण्याचा सहायक पोलीस उपनिरीक्षक सूर्यभान राणुबा वाघ (वय ४९) बुधवारी लाचलुचपत विभागाच्या जाळय़ात अडकला. बळीराम पाटील हायस्कूल ते एम २ बसथांब्यावरील हॉटेल पुष्करसमोर सकाळी अकराच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या बाबत पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू होती.
या प्रकरणातील तक्रारदाराने मधुकर विठ्ठल सूर्यवंशी या बिल्डरकडून घर खरेदीसाठी पैसे भरले होते. परंतु त्याला घर बांधून ताबा दिला नाही. यामध्ये फसवणूक झाल्याप्रकरणी तक्रारदाराने सूर्यवंशीविरोधात सिडको पोलिसात तक्रार दिली होती. त्याबाबत गुन्हा दाखल झाला असून, त्याचा तपास वाघ याच्याकडे होता. सूर्यवंशीला अटक करण्यासाठी वाघ याने तक्रारदाराकडे २० हजार रुपये लाचेची मागणी केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा