Maharashtra Assembly Election 2024 Aurangabad East constituency : छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये एक वेगळं चित्र राज्यातील जनतेला पाहायला मिळालं आहे. येथील महाविकास आघाडीमधील बंड पूर्णपणे शमलं आहे. मात्र याचा मविआपेक्षा महायुतीलाच अधिक आनंद झाला असल्याचं पाहायला मिळत आहे. येथील शिवसेना (ठाकरे) पक्षातील बंडखोर उमेदवार राजू वैद्य यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यानंतर काँग्रेसचे या मतदारसंघातील उमेदवार लहू शेवाळे यांनी शिवसेनेचे (ठाकरे) आभार मानायला हवे होते. मात्र, त्याऐवजी राज्य सरकारमधील मंत्री, भाजपा नेते तथा औरंगाबाद पूर्व मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अतुल सावे यांनी शिवसेनेचे (ठाकरे) आभार मानले आहेत. त्यांनी जिल्ह्यातील शिवसेनेचे (ठाकरे) वरिष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांचे आभार मानले. तसेच अतुल सावे खैरे यांच्या पाया देखील पडले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा