छत्रपती संभाजीनगर – शिक्षक पात्रता (टीईटी) आणि शिक्षक अभियाेग्यता चाचणी (टीएआयटी) २०२३ केव्हा घेणार, याचे वेळापत्रक ५ एप्रिलपर्यंत सादर करण्याचे आदेश प्रतिवादींना नाेटीस काढून मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे व न्या. आर. एम. जाेशी यांनी दिले आहेत.
याप्रकरणी शिक्षक भरतीतील पात्र उमेदवार गणेश शेटे यांनी ॲड. सिद्धेश्वर ठाेंबरे यांच्यामार्फत रीट याचिका दाखल केली आहे. याचिकेनुसार यासंदर्भात २०१७ पासून शिक्षक भरतीही पवित्र पाेर्टल प्रणाली मार्फत सुरू केलेली आहे. या अगाेदर २०१७ पासून टीएआयटी (अभियाेग्यता चाचणी) मध्ये मिळालेल्या गुणानुसार शिक्षक भरती केली जाते. या अगाेदर २०१७ मध्ये अभियाेग्यता चाचणी घेण्यात आली हाेती व त्याअगाेदर शिक्षक भरती झालेली आहे. २०१७ पासून ते २०२२ पर्यंत अभियाेग्यता चाचणी झालेली नाही. उच्च न्यायालयाने त्या संदर्भात एक सुमाेटाे याचिका दाखल करून त्यामध्ये वर्षातून किमान दाेन वेळेस अभियाेग्यता चाचणी घेण्याचे आदेश २७ सप्टेबर २०२२ मध्ये शासनाला दिलेले आहेत.
हेही वाचा >>>धर्मदाय आयुक्त कार्यालयातील निरीक्षक सापळ्यात; मठाच्या गुप्त दानपेटीतील रक्कम काढून देण्यासाठी लाच
ही याचिका प्रलंबित आहे. त्या याचिकेमध्ये दिलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र शासनाने टीएआयटी २०२२ ही जानेवारी, फेब्रुवारी २०२३ मध्ये घेतली. त्याआधारे शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली हाेती. टीआयटी परीक्षेच्या आधारे २५ फेब्रुवारी २०२४ राेजी मुलाखत न घेताच उमेदवाराची यादी जाहीर केली व त्याची नियुक्ती देण्याची प्रक्रिया सुरू आहे.उच्च न्यायालयाने दिलेल्या सुमाेटाे याचिकेच्या आदेशानुसार टीएआयटी २०२३ तत्काळ घेण्यात यावी म्हणून याचिका ॲड. सिद्धेश्वर ठाेंबरे यांच्यामार्फत दाखल केलेली आहे.