औरंगाबादच्या औद्योगिक विकासासाठी विमानतळाचे विस्तारीकरण आवश्यक असल्याचे प्रतिपादन करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूसंपादनासाठी २०० कोटी रुपये देण्याचे निर्देश महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला (एमआयडीसी) दिले. त्यामुळे विमानतळाच्या विस्तारीकरणाचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरच्या (डीएमआयसी) वतीने विकसित करण्यात येत असलेल्या शेंद्रा बिडकीन औद्योगिक क्षेत्राबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी गुरुवारी आढावा बैठक घेतली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, औरंगाबाद विमानतळाची धावपट्टी लहान असल्याने मोठी विमाने उतरण्यास अडचणी येतात. धावपट्टीच्या विस्तारासाठी १८० हेक्टर जमीन संपादित करावी लागणार असून त्यासाठी सुमारे २०० कोटी रुपये लागतील. ती रक्कम एमआयडीसीने राज्य शासनाला द्यावी. या कॉरिडॉर अंतर्गत पहिल्या टप्प्यात देशातील पहिली स्मार्ट वसाहत विकसित करावी. त्यामध्ये ६० टक्के औद्योगिक क्षेत्र असून ४० टक्के क्षेत्रावर नागरिकांसाठी स्मार्ट सिटी, आरोग्य, शिक्षण सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. या बैठकीस उद्योगमंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा, एमआयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी, डीएमआयसीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम कुमार, महाव्यवस्थापक गजानन पाटील आदी उपस्थित होते.

The authority is taking possession of houses distributed to 21 people with fake documents
घर असतानाही पात्र झालेल्या २१ झोपडीवासीयांविरुद्ध कारवाई ! सर्व घरे ताब्यात घेणार!
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Prices will increase due to reduced arrival of chillies Nandurbar news
यंदा लाल तिखटाचा भडका उडणार; मिरचीची आवक घटल्याने दर वाढणार
Mechanism to assess the effects of earthquakes in 30 dams in Maharashtra
राज्यातील ३० धरणांमध्ये भूकंपाचे परिणाम जोखण्यासाठी यंत्रणा
The work on six water tanks of Pune Municipal Corporation is still not complete Pune print news
सहा टाक्या, तरी पाणी मिळेना! पुण्यातील प्रकार
Drone survey of 332 villages in Sangli district
सांगली जिल्ह्यातील ३३२ गांवाचे ड्रोनव्दारे सर्व्हेक्षण; ६७ हजार मिळकतपत्रिका, सनद नकाशे तयार
got elected four times through evms supriya sule on evm tampering allegations by congress
चार वेळा निवडून आले ईव्हीएमवर संशय कसा घेऊ? खासदार सुप्रिया सुळे यांचे विधान
chhatrapati Sambhajinagar sports complex scam
१३ हजार पगार असलेल्या कर्मचाऱ्याने घातला २१ कोटींचा गंडा; प्रेयसीला दिला ४ बीएचकेचा फ्लॅट, स्वतः घेतल्या आलिशान गाड्या
Story img Loader