औरंगाबाद महानगरपालिकेच्या स्मार्टसिटी अंतर्गत यंत्रणेमधील एका बसने अचानक पेट घेतला. या घटनेत जीवित हानी झाली नाही. परंतु बस पूर्णपणे जळून खाक झाली. वरुड फाटा ते शेंद्रा औद्योगिक वसाहत मार्गावर रविवारी दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली.

अग्निशमन विभागाच्या पथकाला बस पेटल्यासंदर्भातील माहिती देण्यात आल्यानंतर मुख्य अग्निशमन विभागाचे अधिकारी आर. के. सुरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअग्निशमन अधिकारी एस. के. घाटेशाही, खांडेकर, एच. बी. पवार, किरण शेलार, अब्दुल हमीद आदींनी घटनास्थळी बंबसह जाऊन आग विझवली.

Story img Loader