छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगर महानगराच्या पोलीस आयुक्तपदी प्रवीण पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या गृहविभागाने शासनाचे सहसचिव व्यंकटेश भट यांच्या स्वाक्षरीने पवार यांच्या नियुक्तीचे आदेश मंगळवारी सायंकाळी काढले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : छत्रपती संभाजीनगर: परधर्मीय तरूणीशी बोलल्यावरून तरुणाला जमावाकडून मारहाण

सध्या आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार संदीप पाटील यांच्याकडे आहे. संदीप पाटील हे नागपूर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक आहेत. पोलीस आयुक्त मनोज लोहिया हे ३० मे रोजी निवृत्त झाले असून, त्यानंतरचा प्रभार संदीप पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला होता. नवनियुक्त पोलीस आयुक्त हे पुणे सहआयुक्त पदावरून येथील पदभार स्वीकारतील.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aurangabad pravin pawar appointed as commissioner of police of chhatrapati sambhajinagar css