सप्टेंबरअखेरीस होण्याची शक्यता
वारंवार पडणारा दुष्काळ, रखडलेले सिंचन प्रकल्प, अनुशेषाचे भिजत घोंगडे या पाश्र्वभूमीवर निर्माण झालेल्या रोषाची दखल घेऊन त्यावर उपाययोजना करण्यास सरकार कटिबद्ध आहे, हा संदेश देण्यासाठी सप्टेंबरच्या शेवटच्या किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात मराठवाडय़ात मंत्रिमंडळाची बठक होणार आहे. विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी कार्यालयात या बठकीची पूर्वतयारी सुरू झाली आहे. औरंगाबादच्या जिल्हाधिकारी निधी पांडेय यांनी बुधवारी यासाठी विशेष बठक घेतली.
या पूर्वी २००८ मध्ये मराठवाडय़ासाठी मंत्रिमंडळाची स्वतंत्र बठक घेण्यात आली होती. मात्र, या बठकीत घेण्यात आलेले बहुतांश निर्णय अमलात न आल्याने पुढील अनेक वष्रे भाजप नेते व कार्यकत्रे आघाडी सरकारमधील नेत्यांना जाब विचारत होते. त्यानंतर मंत्रिमंडळाची स्वतंत्र बठक घेण्याची गरजच नाही, अशी भूमिका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतली होती. त्यामुळे मराठवाडय़ाकडे दुजाभावाने पाहिले जाते, अशी भावना रुजू लागली होती. या पाश्र्वभूमीवर फडणवीस सरकार बठक घेणार की नाही, असा प्रश्न होता. मात्र, फडणवीस यांनी ही बठक सप्टेंबरमध्ये होईल, असे सांगितले होते. या महिन्यात गणेशोत्सव होत आहे.विसर्जनानंतर म्हणजे २७ सप्टेंबपर्यंत मंत्रिमंडळ बठक होऊ शकेल, असे सांगितले जाते. विसर्जन मिरवणुकीनंतर पोलीस यंत्रणेवरील भारही कमी होईल. त्यानंतर मंत्रिमंडळ बठकीच्या तारखा ठरतील. या बठकीत कोणत्या विभागाने काय प्रस्ताव ठेवायचे, याची पूर्वतयारी आता सुरू झाली आहे.