छत्रपती संभाजीनगर :  बीड जिल्हाधिकाऱ्यांचे शासकीय वाहन जप्त करण्याचे आदेश माजलगावच्या न्यायालयाने दिले आहेत. वडवणी तालुक्यातील चिखलबीड येथे 1998 मध्ये लघु सिंचन प्रकल्प उभारण्यात आला होता. या प्रकल्पासाठी तीन शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. त्याअंतर्गत काहींची तुटपुंजा मोबदला देऊन त्यांची बोळवण केली तर काहींना १९९८ पासून संपादित केलेल्या जमिनीचा मावेजा अद्याप मिळालाच नाही. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली त्यांना ३२ लाखांची भरपाई देण्याचे आदेश माजलगाव सत्र न्यायालयाने दिले. कोर्टाच्या आदेशानंतरही शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळाले नाही. या प्रकरणात न्यायालयाने शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल दिल्यानंतरही प्रशासनाकडून काहीच कार्यवाही झाली नाही, हे निदर्शनास आणून दिल्यानंतर न्यायालयाने बीड जिल्हाधिकाऱ्यांचे वाहन जप्त करण्याचे आदेश दिले.

Story img Loader