सुहास सरदेशमुख

औरंगाबाद: ‘पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ हवेत कशाला’, ‘जायकवाडीच्या वरची सर्व धरणे बॉम्ब लावून उडवून द्यायला हवीत’, अशी टोकदार विधाने करून राज्याच्या राजकारणात चर्चा घडवून आणणाऱ्या आमदार प्रशांत बंब यांच्या विरोधात त्यांच्या गंगापूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या रणनीतीला यश येताना दिसू लागले आहे. गंगापूर साखर कारखान्यात प्रशांत बंब यांचा व त्यांच्या समर्थक उमेदवारांचा पराभव त्यांची राजकीय अडचण वाढविणारे असल्याचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत.

congress government analysis Telangana caste Survey
अन्वयार्थ : जनगणना कधी?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
काँग्रेसची ईगल समिती नेमकं कसं काम करणार? कथित मतदार घोटाळ्यांचा छडा लागणार? (फोटो सौजन्य)
Political News : काँग्रेसची ईगल समिती नेमकं कसं काम करणार? कथित मतदार घोटाळ्यांचा छडा लागणार?
delhi assembly elections 2025
लालकिल्ला : दिल्ली भाजपसाठी आणखी प्रतिष्ठेची!
आम आदमी पार्टीला सोडचिठ्ठी देणारे ८ आमदार कोण? त्यांनी भाजपात प्रवेश का केला? (फोटो सौजन्य पीटीआय)
Political News : आम आदमी पार्टीच्या ८ विद्यमान आमदारांनी भाजपात प्रवेश का केला?
Prithviraj Chavan On Budget 2025
Prithviraj Chavan : “अर्थसंकल्पाने आमची घोर निराशा केली”, पृथ्वीराज चव्हाण यांची अर्थसंकल्पावरून टीका
Ajit Pawar On Suresh Dhas
Ajit Pawar : “सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी देणंघेणं नाही”, अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “खालचे कार्यकर्ते…”

या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा मानस व्यक्त करून राष्ट्रवादी काँग्रेसचे पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी दौरे वाढविले आहेत. दुसरीकडे गंगापूर मतदारसंघात कृष्णा पाटील डोणगावकर यांच्या नेतृत्वाखाली सहकारी संस्थेतील निवडणुकीत प्रशांत बंब यांचा पराभव केल्याने गंगापूर विधानसभेतील मतदारांच्या मनात चलबिचल निर्माण करण्यात विरोधकांना यश मिळत असल्याचे दिसून येत आहे.

 गेल्या १४ वर्षांपासून बंद असणाऱ्या गंगापूर साखर कारखान्याच्या निवडणुकीत साडेसात हजार ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कृष्णा पाटील डोणगावकर यांच्या नेतृत्वाखालील शिवशाही पॅनलला स्वीकारले. हा कारखाना सुरू करण्यासाठी आमदार बंब यांनी पुरेसे प्रयत्न केले नाहीत. खरे तर या कारखान्याच्या व्यवहारात भ्रष्टाचाराचेही आरोप करण्यात आले होते. ऊस उत्पादक म्हणजे तसा बडा शेतकरीवर्ग आमदार बंब यांच्या पाठीशी यापुढे उभा राहणार नाही, असा या निकालाचा अर्थ आहे. त्यामुळे प्रशांत बंब यांच्यासमोर आव्हान उभे ठाकले आहे. कारखाना निवडणुकीमध्ये जरी सात-साडेसात हजार मतदान दिसत असले तरी त्यांच्या घरातील मतदान गृहीत धरल्यास अंदाजे २५ हजार मतदारांचा कौल म्हणून या निकालाकडे पाहिले जात आहे.

त्यामुळे त्यावर उपाय म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये वॉटर ग्रिडचे काम पूर्ण करणे तसेच म्हैसमाळ येथे पर्यटनासाठीच्या सोयी निर्माण करण्याचे नियोजन आमदार बंब यांच्याकडून आखले जात आहे. वेगाने बोलणारा आणि तेवढय़ा वेगाने निधी मंजूर करून आणणारा, अशी प्रतिमा आमदार बंब यांनी मतदारसंघात करून ठेवली होती. मात्र, राज्यातील अनेक भागांत त्यांची प्रतिमा वादग्रस्त होती. राज्यातील अनेक आमदारांनी आमच्या मतदारसंघात आमदार बंब नाहक लक्ष घालतात, अशी तक्रार विधिमंडळ अधिवेशनाच्या काळात केली होती; पण आमदार बंब यांनी त्यांचा मतदारसंघ बांधला आहे. त्यासाठी त्यांनी खास पगारी कार्यकर्ते नेमले आहेत.

समाजसेवा महाविद्यालयातील तरुण योजनांच्या अंमलबजावणीचे काम करतात. त्यामुळे त्यांना मतदारसंघात हरविण्यासाठी राष्ट्रवादी व शिवसेना विशेष प्रयत्न करीत आहेत. गंगापूर साखर कारखाना सुरू करणाऱ्याचे नेतृत्व ज्यांच्याकडे जाईल तो व्यक्ती गंगापूरचा आमदार होऊ शकतो, या विश्वासातून व्यूहरचना आखून शिवसेना काम करत आहे. याच काळात राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण यांनीही लक्ष घातले आहे. त्यामुळे आमदार बंब यांच्या विरोधात चक्रव्यूह रचला जात असल्याचे दिसून येत आहे. गेली काही वर्षे पाण्याचा लढा देणारे तसेच सलग तीन निवडणुकांमध्ये विजयी होणारे आमदार बंब यांच्या अडचणीत वाढ होऊ लागली आहे.

Story img Loader