मकरंद अनासपुरेच्या अभिनयाने साकार झालेला ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ या मराठी चित्रपटाचा दुसरा भाग राज्याच्या राजकारणात सुरु असून गल्लीतल्या ‘गोंधळाला’ दिल्लीतून ‘मुजरा’ आल्याची चर्चा ग्रामपंचायतींच्या निकालानंतर राजकीय वर्तुळात रंगली आहे. राज्याच्या ग्रामविकास मंत्री आणि भारतीय जनता पार्टीच्या राज्यातील महत्वाच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या परळी तालुक्यात ७० टक्के ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवण्यात यश आल्याचा दावा भाजपनं केलाय. तर याच ठिकाणी राष्ट्रवादीकडूनही ८० टक्के विजयाचा दावा केला जातोय. ग्रामपंचायतीच्या निवडणुका या पक्षाच्या चिन्हावर झाल्या नसल्यानं एखाद्या पक्षाच टक्केवारीत यश मोजणे कठीण आहे. हे चित्र फक्त परळी तालुक्याचं नाही, तर राज्यभरात हीच स्थिती आहे. सर्वच राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते ‘मै बडा’ हे सांगण्यात व्यग्र आहेत. सोशल मीडियावर, पत्रकार परिषद घेऊन दावे-प्रतिदावे केले जात आहेत. पक्ष नेतृत्वाने केलेल्या वक्तव्यामुळे गावच्या पारावर सध्या सर्व पक्षाचे समर्थक आपापल्या पक्षाच्या फुशारक्या मारत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा