बस वाहकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि.५) सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास सिडको बसस्थानकात समोर आली. सचिन एन. वानखेडे (रा. वर्धा) असे संशयास्पद मृत्यू झालेल्या बस वाहकाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन वानखेडे हा एसटी महामंडळात बसवाहक म्हणून नोकरीला होता. शुक्रवारी (दि.४) रात्री तो वर्धा औरंगाबाद या मुक्कामी बससोबत औरंगाबादला आला होता. सचिन वानखेडे व त्याच्यासोबत असलेल्या चालकाने बस सिडको बसस्थानकाच्या पार्कींगमध्ये उभी केली होती.
शनिवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास सचिन वानखेडे हा बसच्या पार्कींगमध्ये बेशुध्दावस्थेत पडून असल्याचे निदर्शनास आले. त्याला एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी उपचारासाठी घाटीत दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास जमादार शेजुळ करीत आहेत.