लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

छत्रपती संभाजीनगर : बीड जिल्ह्यातील राजस्थानी मल्टिस्टेटकडून १ कोटी ९ लाखांची तर ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या संचालकांनी ६५ लाखांची १८ हजार ६५६ रुपयांची जादा परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याच्या दोन वेगवेगळया तक्रारी येथील जवाहरनगर पोलीस दाखल करण्यात आल्या आहेत.

राजस्थानी मल्टिस्टेटविरुद्ध ठेवीदार सुनील बाबुराव खारगे (रा. टाऊन सेंटर बजाजनगर) यांनी फिर्याद दिली. त्यावरून सोसायटीचे कार्यकारी संचालक चंदुलाल बियाणी, जगदीश बियाणी तसेच सर्व संचालक मंडळाविरुद्ध (सर्व रा परळी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार आरोपींनी १५ जुलै २०१९ पासून आजपर्यंत ठेवी ठेवण्यासाठी आवाहन केले. आपल्यासह इतर ठेवीदादांची मिळून एकूण १ कोटी ९ लाख ३९ हजार ७५१ रुपयाची आर्थिक फसवणूक केल्याची फिर्याद जवाहरनगर पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आणखी वाचा-छत्रपती संभाजीनगर: बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू

ज्ञानराधा को ऑपरेटिव्ह सोसायटीने १२ टक्के आकर्षक परतावा मिळेल असे आमिष दाखवून फसवणूक केल्याची तक्रार प्रा. डॉ. माधव संताजीराव हांडे (वय ६४ रा. युथ हॉस्टेल जवळ बाबा पेट्रोल पंप) यांनी फिर्याद दिली. त्यारून ज्ञानराधा मल्टीस्टेटचे चेअरमन सुरेश ज्ञानोबा कुटे (रा. बीड) शाखा व्यवस्थापक शिवलिंग पवळ, प्रमोद निर्मलसह सर्व संचालक मंडळावर गुन्हा दाखल झाला आहे.