चाळीसगाव ते औरंगाबाद हा नियोजित रेल्वेमार्ग २०१९पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यातील रेल्वेस्थानकांची नावेही जवळपास निश्चित झाली आहेत. चाळीसगाव ते औरंगाबाद दरम्यान ७ थांबे असतील, तर या मार्गात १३ किलोमीटर बोगदाही तयार केला जाणार आहे. या बोगद्यातूनच रेल्वेमार्गही काढण्याचा प्रस्ताव नुकताच केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मंजूर केला.
रेल्वे विभागाने संमती दिल्यानंतर संयुक्तपणे ही कार्यवाही केली जाईल, असे सांगितले होते. हा मार्ग पूर्ण करण्यासाठी मराठवाडा रेल्वे विकास समितीच्या वतीने सातत्याने पाठपुरावा केला होता. लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी या रेल्वेमार्गासाठी अधिक जोर लावण्याची गरज असल्याचे समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश वर्मा यांनी म्हटले आहे. हे काम पूर्ण झाल्यास औरंगाबाद ते मनमाड हा १३० किलोमीटरचा, तर मनमाड ते चाळीसगाव असा १०० किलोमीटरचा फेरा वाचणार असून यामुळे दळणवळणात मोठी वाढ होईल, असे वर्मा यांनी म्हटले आहे.

Story img Loader