छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील खुल्या ४० मतदारसंघापैकी २६ आमदार मराठा समाजाचे. २०१९च्या निवडणुकीत सर्वाधिक ११ मराठा आमदारांचे बळ भाजपच्या बाजूने. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मराठवाड्यात शुन्यावर आलेल्या भाजपच्या ११ मराठा आमदारांवर ‘मराठा मतपेढी’ भाजपच्या बाजूने वळविण्याचे आव्हान उभे आहे.

लाेकसभा निवडणुकीपूर्वी मराठवाड्यात निर्माण झालेल्या देवेंद्र फडणवीस विरोधाच्या वातावरणात आपला प्रभाव टिकविण्यासाठी आमदारांनी आतंरवली सराटीच्या फेऱ्या पूर्ण केल्या आहेत. मराठवाड्यातील मराठा आमदारांचा आकडा सांगून ‘ओबीसी’ एकत्रिकरणाचे प्रयोगही सुरू झाले आहे. मराठवाड्यातील सात लोकसभा मतदारसंघात महायुतीला फटका बसलाच. लातूर हा आरक्षित मतदारसंघ वगळता सात लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाचेच खासदार निवडून आले आहेत.

Actor Govinda chest pain
अभिनेता गोविंदा छातीत दुखू लागल्याने रोड शो अर्धवट सोडून मुंबईत परत
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
dcm devendra fadnavis in loksatta loksamvad
मराठा समाज ८० टक्के हिंदुत्ववादी; महायुतीलाच पाठिंबा मिळेल!उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ठाम विश्वास
Phulumbri Assembly Constituency Assembly Election 2024 Challenge to BJP in Haribhau Bagde constituency
हरिभाऊ बागडे यांच्या मतदारसंघात भाजपला गड राखण्याचे आव्हान
Laxman Dhoble is in the Pawar group and son abhijit dhoble in opposition role
मोहोळमध्ये ढोबळे पिता-पुत्राचे निराळे सूर!
Narendra Modi, Narendra Modi Pune,
पुणे : मोदींच्या सभेसाठी भाजपसह महायुतीसमोर ‘हे’ आव्हान! स. प महाविद्यालयाच्या मैदानावर मंगळवारी होणार सभा
dhananjay munde vs rajesaheb deshmukh in parli
लक्षवेधी लढत: धनंजय मुंडेंसमोर ‘मराठा उमेदवाराचे’ आव्हान

हेही वाचा – निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार, राज ठाकरे यांच्या यात्रा तर उद्धव ठाकरे यांचे मेळावे

मराठवाड्यात एकूण ४६ मतदारसंघ. त्यातील औरंगाबाद पश्चिम, उदगीर, उमरगा, केज, बदनापूर व देगलूर हे मतदारसंघ अनुसुचित जाती- जमातीसाठी राखीव. यातील खुल्या मतदारसंघात भाजपचा प्रभाव अधिक होता. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर कोणत्या पक्षाकडे किती मराठा आमदार आहेत, याची यादी करण्याची प्रक्रिया वेगात आहे. राजकीय पक्षातील ओबीसी कार्यकर्ते आता ही आकडेवारी आवर्जून सांगू लागले आहेत. शिवसेनेच्या शिंदे गटात चार, उद्धव ठाकरे यांचे दोन, काँग्रेसचे पाच, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे चार तर शरद पवार गटाचे केवळ एक आमदार मराठा आहेत.

मराठवाड्यात भाजपचे १६ आमदार आहेत. यापैकी ११ मराठा समाजाचे. मराठा आमदारांपैकी हरिभाऊ बागडे यांची राज्यपालपदी नियुक्ती झाल्याने त्यांच्या फुलंब्री मतदारसंघात नवा चेहरा येऊ शकेल पण जिंकलेल्या अन्य १० मतदारसंघात ‘मराठा मतपेढी’ टिकवून ठेवण्याचे आव्हान उभे आहे. महायुतीच्या बाजूने मराठा मतपेढीसाठी प्रकाश सोळंके, बाळासाहेब आसबे, बाबासाहेब पाटील, राजू नवघरे ही मंडळीही भर टाकू शकतात. पण आता बहुतांश मंडळी ‘आरक्षण’ चर्चा वगळून प्रचार करू लागली आहेत.

‘मराठा, मुस्लिम व दलित’ असा मतपेढीला आकार आल्याचे लोकसभेत दिसून आल्यानंतर महाविकास आघाडीतील आठही मराठा आमदारांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. यामध्ये लातूरचे अमित देशमुख, धीरज देशमुख, सुरेश वरपुडकर, माधवराव पाटील जवळगावकर, मोहन हंबर्डे यांचा समावेश आहे. त्याचबरोबर शिवसेनेचे कैलास पाटील, डॉ. राहुल पाटील तर राष्ट्रवादीच्या राजेश टोपे यांचा समावेश आहे. मराठा मतपेढीला भाजप विरोधाची किनार असल्याने महाविकास आघाडीचे नेते आरक्षण विषयावर बोलू लागले आहेत. तर भाजपमधील मराठा नेते आंतरवली सराटीला जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेण्याच्या प्रयत्नात आहेत. दरम्यान आरक्षण विषय बाजूला जाऊन ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे’ हप्ते मिळाल्यावर वातावरण बदलते का, याचीही चाचपणी केली जात आहे.

मराठा आमदारांचे पक्षीय बलाबल कसे ?

मराठवाड्यातील २६ मराठा आमदारांपैकी चार आमदार शिवसेनेच्या शिंदे गटाचे आहेत. यातील संदीपान भुमरे हे खासदार झाले आहेत. त्यांच्याशिवाय वैजापूर मतदारसंघातील रमेश बोरनारे, नांदेडचे बालाजी कल्याणकर आणि तानाजी सावंत यांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीत तानाजी सावंत यांच्या मतदारसंघातून महाविकास अघाडीच्या ओम राजेनिंबळाकर यांना ८४ हजाराहून मताधिक्य होते. परतूर मतदारसंघाचे बबनराव लोणीकर, भोकरदनचे संतोष दानवे, राजेश पवार, लक्ष्मण पवार , संभाजी पाटील निलंगेकर, अभिमन्यू पवार, राणाजगजीतसिंह पाटील, मेघना बोर्डीकर, तान्हाजी मुटकुळे या भाजपच्या मंडळींसमोर ‘मराठा मतपेढी’ टिकवून ठेवण्याचे आव्हान असणार आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडे राजेश टोपे हे एकमेव आमदार. तर अजित पवार यांच्या गटाकडे प्रकाश सोळंके, बाळासाहेब आसबे, बाबासाहेब पाटील व राजू नवघरे हे चार आमदार आहेत.

हेही वाचा – बीडमधील एक काका-पुतण्या संघर्ष टळला ?

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील महत्त्वाचे नेते. त्यांना लोकसभा निवडणूक लढवायची होती. त्यामुळे त्यांनी काही मतदारसंघात ताकद लावली होती. त्यांना किती प्रभाव निर्माण करता येतो, यावर संभाजीनगर मतदारसंघातील गणिते अवलंबून असणार आहेत. पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनाही आता विधानसभा निवडणुकीत नशिब आजमावून पहावयाचे आहे. त्यामुळे ते गंगापूर मतदारसंघात बांधणी करत आहेत. विक्रम काळे यांचेही नाव आमदारांच्या यादीमध्ये घेतले जाते. त्यामुळे ही मंडळी ‘मराठा मतपेढी’ ला कोणाच्या बाजूने अनुकूल करू शकतात, यावरही विधानसभा निवडणुकीतील रणनीती ठरण्याची शक्यता आहे.