छत्रपती संभाजीनगर : प्रेम प्रकरणातून चुलत भावाने तिसगाव परिसरातील खवड्या डोंगरावरून १७ वर्षीय बहिणीला ढकलून दिले. सोमवारी दुपारी उघडकीस आलेल्या या घटनेत तरुणीचा मृत्यू झाला असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
हेही वाचा : Dharashiv Crime News : शेतात विहिरीतील पाणी देण्यावरून हाणामारी; तिघांचा मृत्यू, महिला गंभीर जखमी
मृत तरुणी ही १७ वर्ष २ महिन्याची होती. ही अंबड तालुक्यातील एका गावात आपल्या आई वडिलांसह राहत होती. ती १२ वीत शिक्षण घेत होती. दरम्यान ती १० दिवसांपूर्वी वाळूज येथील वळदगाव येथे तीच्या काकाकडे राहण्यासाठी आली होती. सोमवारी दुपारी तीच्या चुलत भावाने मृत तरुणीला दुचाकीवरून खवड्या डोंगरावर नेले व तेथून तिला ढकलून दिले. यात तरुणीचा मृत्यू झाला.