राज्य शासनातर्फे चालविण्यात येणाऱ्या विभागीय क्रीडा संकुलात कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने संकुलाच्या बँक खात्यातून २१ कोटी रुपयांची रक्कम वळती केल्याचे प्रकरण समोर आले आहे. सदर कर्मचाऱ्याला महिना १३ हजार रुपये वेतन मिळत होते, अशी माहिती समोर येत आहे. संकुलाची रक्कम इतर बँक खात्यात वळवून या कर्मचाऱ्याने आलिशान जीवनशैली स्वीकारली होती. प्रेयसीला ४ बीएचकेचा फ्लॅट आणि महागड्या भेटवस्तू त्याने दिल्या होत्या. तसेच स्वतःसाठी आलिशान गाड्यांची खरेदी केली होती. या फसवणुकीचा भांडाफोड झाल्यानंतर सदर कर्मचारी फरार आहे.

एनडीटीव्हीने दिलेल्या बातमीनुसार, छत्रपती संभाजीनगरमधील राज्य शासनाच्या विभागीय क्रीडा संकुलात सदर कर्मचारी काम करत होता. सदर फसवणूक उघड झाल्यानंतर हर्शल कुमार क्षीरसागर फरार झाला आहे. तर त्याला मदत करणाऱ्या एका महिलेला तिच्या पतीसह पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ वर्षीय संगणक चालकाने फसवणूक करण्यासाठी वेगळीच शक्कल लढवली. त्याने क्रीडा संकुलाच्या लेटरहेडचा वापर करत बँकेशी संपर्क साधला आणि अधिकृत खात्याशी जोडलेला ईमेल आयडी बदलून घेतला.

Special trains for Konkan and Goa on year end and long weekend
कोकण, गोव्यासाठी विशेष रेल्वेगाड्या
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
land acquisition for ring road
रिंग रोडसाठी २०० हेक्टर भूसंपादन बाकी; ५०० कोटींच्या निधीची रस्ते विकास महामंडळाकडे मागणी
demand for ransom of Rs 2 crore case filed against three including Valmik Karad in kej
दोन कोटींच्या खंडणीची मागणी; वाल्मीक कराडांसह तिघांवर केजमध्ये गुन्हा
Action taken against 20 dumpers for illegally dumping debris navi Mumbai news
नवी मुंबई: राडारोडा टाकणाऱ्या २० डंपरवर कारवाई
jsw e cars marathi news
‘जेएसडब्ल्यू‘कडून सात लाख ई-मोटार निर्मितीचे उद्दिष्ट, प्रस्तावित प्रकल्पाला पर्यावरण विभागाकडून मंजुरी
29 villages Vasai Virar, Vasai Virar Municipal Corporation, Vasai Virar,
२९ गावांचा वसई विरार महापालिकेत समावेश, ३१ हजार हरकतींवर जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी
traffic servants Dombivli, concrete road work Dombivli,
डोंबिवलीत काँक्रीट रस्ते कामांच्या ठिकाणी वाहतूक सेवकांची फौज

हे वाचा >> मुंबईत १० मिनिटांच्या प्रवासासाठी घेतले २८,०० रुपये; NRI ची फसवणूक करणाऱ्या कॅब चालकाला अटक

ईमेल आयडी बदलून केली फसवणूक

आरोपीने आधीच्या ईमेल आयडीसारखाच एक नवा ईमेल तयार केला. ज्यामध्ये फक्त एका अक्षराचा बदल केला होता, ज्यामुळे तो आधीच्याच ईमेल आयडीसारखा भासत होता. ईमेल आयडी बदलल्यानंतर आरोपीने बँक खात्याचे नेट बँकिंगही सुरू करून घेतले. यानंतर ऑनलाईन व्यवहार करण्यासाठीचे सर्व ओटीपी या ईमेलवर येऊ लागले.

इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून आरोपीने १ जुलै ते ७ डिसेंबर या काळात संकुलाच्या खात्यामधून २१.६ कोटींची रक्कम १३ विविध बँक खात्यात वळती केली.

गंडा घातलेल्या रकमेतून उधळपट्टी

फसवणूक केलेल्या रकमेतून आरोपीने १.२ कोटींची बीएनडब्लू गाडी, १.३ कोटींची एसयूव्ही आणि ३२ लाखांची बीएमडब्लू दुचाकी खरेदी केली. तसेच त्याने त्याच्या प्रेयसीसाठी छत्रपती संभाजीनगर विमानतळानजीक ४ बीएचकेचा फ्लॅट विकत घेतला. तसेच हिरेजडीत चष्माही प्रेयसीला भेट म्हणून दिला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी व्यक्त केलेल्या संशयानुसार या गुन्ह्यात अनेक लोकांचा सहभाग असू शकतो. तसेच ज्या खात्यात रक्कम वळती केली गेली, त्याचा तपशीलही पोलीस आता गोळा करत आहेत. पोलिसांनी आरोपीच्या आलिशान गाड्या जप्त केल्या असून त्याचा शोध सुरू केला आहे. क्रीडा संकुलाच्या समितीमधील सदस्यांना बँक खात्याच्या आर्थिक व्यवहारात अनियमितता आढळून आल्यानंतर हा घोटाळा उघडकीस आला.

Story img Loader