छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयाच्या सायबर पोलीस ठाण्याकडून विविध समाजमाध्यमावरील संदेशांवर २४ तास लक्ष ठेवण्यात येत असून, आजपर्यंत ८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर ५०६ संदेश नष्ट करण्यात आले आहेत, अशी माहिती सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवचरण पांढरे यांनी दिली.
सध्या राज्यात असलेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावरील शक्यता लक्षात घेऊन संभाजीनगर शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात समाजमाध्यमावरून पाठवल्या जाणाऱ्या संदेशांवर लक्ष ठेवले जात आहे. यामध्ये सायबर पोलिसांनी २० मार्च २०२५ रोजी २ गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. याशिवाय पोलीस समाजमाध्यमावरील आक्षेपार्ह संदेश शोधण्याचे कामही सुरू असल्याचे सांगण्यात आले.
महाराष्ट्रात सध्या औरंगजेबाचा मुद्दा पेटलेला असून, नागपूरमध्ये दंगलही उसळळी होती. य पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवले जात आहे. दोन दिवसांपूर्वी दोन दिवस पाेलिसांचा रूटमार्च निघाला होता. सिटी चौक पाेलीस ठाण्याच्या परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता.