छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळांतर्गत येत असलेल्या पाच जिल्ह्यांत मंगळवारपासून सुरू होत असलेल्या बारावी परीक्षेसाठी ४६० केंद्र असल्याची माहिती मंडळाचे विभागीय अध्यक्ष अनिल साबळे यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विभागात एकूण १ लाख ८५ हजार ३३० विद्यार्थ्यांनी पहिल्या टप्प्यात परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १६० केंद्र, तर ६३ हजार ९१८ विद्यार्थी असतील. बीडमध्ये १०६ केंद्र व ४३ हजार ७५६ विद्यार्थी, परभणीमध्ये ७१ केंद्र, २७ हजार २३० विद्यार्थी, जालन्यामध्ये ८२ केंद्र आणि ३६ हजार १६६ विद्यार्थी व हिंगोलीमध्ये ४० केंद्र आणि १४ हजार २६० विद्यार्थी परीक्षेस बसणार असल्याचे सांगण्यात आले. पाच जिल्ह्यांत एकूण एक हजार ४०८ महाविद्यालये असून, ५९ परिरक्षक केंद्र आहेत.

नांदेडमध्ये १०७ केंद्र

लातूर विभागाच्या वतीने मंगळवारपासून बारावीच्या द्वितीय सत्र परीक्षांना सुरुवात होत आहे. जिल्ह्यातील १०७ केंद्रांवर ४२ हजार ५२२ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. शिक्षण मंडळाच्या लातूर विभागातर्फे आजपासून बारावीची, तर २१ फेब्रुवारीपासून दहावीची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातील ९० हजार ४५६ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगर, शिक्षण उपनिरीक्षक हनुमंत पोकले यांनी दिली.

परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी १०७ बैठे पथके व १० विशेष भरारी पथके नेमण्यात आली आहेत. तालुका स्तरावर दोन भरारी पथके वेगळी राहणार आहेत. परीक्षेसाठी शिक्षण विभागाची १० पथके आहेत. तसेच महसूल विभागाची तालुकानिहाय पथके आहेत. याशिवाय जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, जिल्हा परिषदेच्या खाते प्रमुखांची पथके, बैठी पथके असणार आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ५० काॅपीची पार्श्वभूमी असलेली केंद्रे असून, तेथील कर्मचाऱ्यांचीही अदलाबदल करण्यात आली आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी (मा.) अश्विनी लाठकर यांनी दिली.