छत्रपती संभाजीनगर: बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानात छत्रपती संभाजीनगर विभागातील अ वर्ग बसस्थानकातून अंबाजोगाई, निलंगा व वैजापूर येथील बसस्थानकांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. ब वर्गातून अंबड, लातूर व हिंगोली तर क वर्गातून भोकर, धर्माबाद व शिरूर अनंतपाळ हे बसस्थानक प्रथम, द्वितीय व तृतीय आले आहेत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून बुधवारी हे निकाल जाहीर झाले आहेत.
अंबाजोगाईने ७६, निलंग्याने ७३ तर वैजापूर बसस्थानकाने ७१ गुण मिळवले. जालना विभागातून अंबडने ८१, लातूर विभागातून लातूरने ३-७२ तर परभणी विभागातून हिंगोलीने ७२ गुण मिळवले. क वर्गातील भोकरने ७४, धर्माबादने ७३ तर शिरूर अनंतपाळने ७१ गुण मिळवले.
हेही वाचा: छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘ स्पेशल २६ ‘, तोतया सीआयडीच्या छाप्यात सात लाख आणि दहा तोळे सोने लंपास
असे बक्षीस असेल
अ वर्गातून अंबाजोगाईला १० लाखांचे, निलंग्याला पाच तर वैजापूरला अडीच लाखांचे बक्षीस मिळणार आहे. ब वर्गातून अंबडला पाच लाख, लातूरला अडीच लाख तर हिंगोलीला दीड लाख, क वर्गातून भोकरला १ लाख धर्माबादला ५० हजार तर शिरूर अनंतपाळला २५ हजार बक्षीस मिळणार आहे.