छत्रपती संभाजीनगर – घरात घुसून राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे कर्मचारी (सीआयडी) असल्याची बतावणी करून रोख सात लाख रुपये व १० तोळे घेऊन नारेगावमधील एका कुटुंबाला लुटण्यात आले. तसेच कुटुंब सदस्यांना पुणे येथे घेऊन जायच्या बहाण्याने नेवाशापर्यंत नेऊन तेथेच सोडून दिल्याप्रकरणी रामचंद्र भाऊसाहेब चव्हाणसह अनोळखी मिळून बारा जणांविरुद्ध एम. सिडको पोलीस ठाण्यात मंगळवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नारेगाव रोडवरील वरद काॅम्प्लेक्स, नेवाशाजवळील पांढरी पूल व दीपज्योत हाॅटेलसमोर लुटीची ही घटना ३० मार्च रोजी सकाळी ते सायंकाळी पाचपर्यंतच्या वेळेत घडल्याचे तक्रारदार महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादी महिला ही बाहेरगावी असल्यामुळे तक्रार तीन महिन्यांनंतर देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Cyber ​​criminals cheated the people of Nagpur of Rs 141 crore
सायबर गुन्हेगारांनी नागपूरकरांना घातला १४१ कोटींचा गंडा, १३ हजारांवर तक्रारी
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
navi mumbai cyber crime
यंदा नवी मुंबईत १ अब्ज ३७ कोटींहून अधिक रुपयांची सायबर लूट
nitin Gadkari fraud loksatta,
नितीन गडकरी यांच्या नावाने १० सराफा व्यावसायिकांची फसवणूक; तोतया सुरक्षा अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा
teacher lost 20 lakh rupees share market
शिक्षकाला वीस लाखांचा गंडा, सुरतचे तीन आरोपी गजाआड; बुलढाणा सायबरची कारवाई
mcoca action against Chuha Gang, Pune, Chuha Gang,
पुणे : दहशत माजविणार्‍या ‘चूहा गँग’वर मोक्का कारवाई, आंबेगाव पोलिसांची कारवाई
Central government Digital arrest
देशभरात ‘डिजीटल अरेस्ट’ची धास्ती, काय दिला जातो जनजागृतीपर संदेश
Police arrested three men for killing young man on Tuljaram College Road Baramati
बारामतीत तरुणाचा खून करुन पसार झालेले तिघे, गजाआड

हेही वाचा – छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तपदी प्रवीण पवार नियुक्त

हेही वाचा – छत्रपती संभाजीनगर: परधर्मीय तरूणीशी बोलल्यावरून तरुणाला जमावाकडून मारहाण

घटनेच्यावेळी नारेगावमधील राहत्या घरात स्वत: तक्रारदार महिला, त्यांचा मुलगा दयानंद मोरे, व त्याचा मित्र, असे सर्व असताना ओळखीतीलच रामचंद्र चव्हाण (रा. पुणे) व सोबतच्या काही महिला, पुरुष हे लाल दिव्याच्या वाहनातून आले. येताच घरातील सदस्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. आम्ही पुणे सीआयडीचे कर्मचारी असल्याचे सांगून धमकावत घरातील साहित्याची झडती सुरू केली. एकूण रोख सात लाख रुपये, १० तोळे सोन्याचे दागिने, पारपत्र, एटीएम कार्ड व महत्त्वाची कागदपत्रे घेऊन सर्वांनाच लाल दिव्याच्या वाहनात बसवून नेवासा परिसरात नेले. तेथे पांढरी पुलाजवळ उतरवून तोतया सीआयडीचा ताफा पसार झाला. तक्रारदार महिला या बाहेरगावी असल्यामुळे फिर्याद देण्यास उशीर झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

Story img Loader