छत्रपती संभाजीनगर – शहरातील क्रांती चौक परिसरात शुक्रवारी दुपारनंतर ५० लाखांची रोकड पकडण्यात आली. जप्त केलेली ही रक्कम, ६० हजारांचे दोन मोबाईल व इतर साहित्य मिळून एकून ५२ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल असून प्राथमिक माहितीनुसार रक्कम हवालाची असल्याचे समजते. याप्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्जुन भास्कर मुंडलिक (वय ५०, तापडियानगर) व सिद्धेश अर्जुन मुंडलिक (वय २३), असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.

वरील दोघेही सिल्लेखाना येथून दुचाकीवर एका बॅगेतून ५० लाखांची रोकड घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त संपत शिंदे यांना मिळाली. त्यांनी या संदर्भातील माहिती पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांना दिल्यानंतर सापळा रचून रक्कम पकडली.

हेही वाचा – एक कोटीची लाच मागणारा पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे याच्याकडे घबाड सापडले; एक कोटी रोख, ७२ लाखांचे दागिने व स्थावर मालमत्ता

हेही वाचा – निवडणुकीच्या धामधुमीत २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

बरोबर आठवड्यापूर्वीच सिल्लेखाना चौकापासून काही अंतरावर असलेल्या पैठणगेट परिसरात ३९ लाख रुपयांची रोकड पकडली होती. त्याच दिवशी छत्रपती संभाजीनगरमधील निवडणुकीचा प्रचार थंडावला होता व १३ मे रोजी मतदान होते. त्याला मतदानासाठी रक्कम देण्याचा वापर करण्याचा संशय होता. आता शुक्रवारी पकडलेली ५० लाखांची रक्कम ही हवालाची असल्याची प्राथमिक माहिती आहे.

Story img Loader